Join us
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी गाण्यावर थिरकली बिग बॉस-११ची ही स्पर्धक, तिच्या डान्सचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल WOW

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 17:42 IST

सोशल मीडियावर बंदगीने तिचा एक बिनधास्त व्हिडीओ शेअर केला आहे. यांत बंदगी हॉलीवुड गायकाच्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस सीझन-११' ची स्पर्धक बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा यांच्या लव्ह स्टोरीची बरीच चर्चा रंगली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोघं अनेकदा एकत्र पाहायला मिळाले. असं असलं तरी काही महिन्यांपासून बंदगी ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर होती. मात्र आता तिने धमाकेदार कमबॅक केले आहे. सोशल मीडियावर बंदगीने तिचा एक बिनधास्त व्हिडीओ शेअर केला आहे. यांत बंदगी हॉलीवुड गायकाच्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये बंदगी डीजे स्नेकच्या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. डीजे स्नेकच्या ताकी ताकी या गाण्यावर बंदगी बेधुंद होऊन कुणालाही घायाळ करेल असा बोल्ड परफॉर्मन्स देत आहे. 

बंदगी कालरा या व्हिडीओत कोरियोग्राफर यशसह बिनधास्त डान्स करत आहे. बिग बॉसच्या घरात सुरू झालेली बंदगी आणि पुनीशची लव्हस्टोरी आजही कायम आहे. दोघांमध्ये प्रेमाचं घट्ट नातं निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी बंदगी आणि पुनीतचा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला होता. ''लव्ह मी'' या व्हिडीओमध्ये बंदगी कालरा आणि पुनीशची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. खुशबू ग्रेवाल आणि मीत ब्रदर्सनी हे गाणं गायलं होतं.

या अल्बममध्ये पहिल्याच भेटीत बंदिगी व पुनीष हे  दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात असे दाखवण्यात आले असून या अल्बममध्ये बंदिगी व पुनीष यांची भन्नाट केमिस्ट्री जुळली आहे. लव्ह मी या अल्बमचे संगीतकार मीत बंधू असून दिग्दर्शक विष्णुदेवा हे आहेत. तर कॅमेरामन आर. डी हे असून निर्माते मीत एन्टरटेन्मेंट आणि मिखिल चंदिरामानी तर सहनिर्माते डॉ. त्वचा हे आहेत. हा व्हिडीओ अल्बमलाही रसिकांनी पसंती दिली होती. सोशल मीडियावर हा तुफान हिट ठरला होता.