Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा गुप्ता आणि सलमान युसुफ खान यांचा सिझलिंग अॅक्ट तुम्ही पाहिला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 11:14 IST

सर्वांना माहीत आहे, ईशा खूप चांगल्या अभिनेत्री आहेत, तसंच सर्वोत्तम डान्सरही आहेत. हे क्षण माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय असणार आहेत, कारण त्यांनी यासारखी स्टाइल यापूर्वी कधीही सादर केलेली नाही आणि माझ्याबरोबरही त्या पहिल्यांदाच डान्स करत आहेत.

'हाय फिवर... डान्स का नया तेवर'  या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट  डान्स  करणारे स्पर्धक आता उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धकांच्या काही जोड्यांच्या बहारदार नृत्याने झाली, आता `बेस्ट डान्सिंग जोडी’चं शीर्षक पटकवण्यासाठी एकमेकांविरोधात सर्वोत्तम ६ स्पर्धक उतरले आहेत. त्यांच्या नजरा केवळ बक्षीसावर आहेत, या जोड्यांनी आतापर्यंत उत्तम कामगिरी केली होती, आणि यापुढेही या फेरीसाठी ते त्यांच्या सर्वोत्तम मूव्ह्ज सादर करतील. क्लासिकल फ्युजन कामगिरीसाठी आशिष आणि ऋतुजा प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत, ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. त्यांच्या सर्वोच्च ऊर्जेसह केलेल्या कामगिरीमुळे सगळे वातावरण भारून जाईल, तसेच ट्रोन ब्रदर्स आणि जुळे भाऊ आकाश आणि सूरज ही या फेरीत आहेत. 'हाय फिवर'मधली दोन गोंडस मुलं लिखित आणि तेजस त्यांचे `जोडीदार’ अनुक्रमे फैसन आणि अंशुल यांच्याबरोबर पुन्हा एकदा भरपूर क्यूटनेस आणि विनोदाच्या अंगाने जाणारी त्यांची अॅक्ट सादर करतील.

या सर्व उत्तम कामगिरींबरोबरच, उपांत्यपूर्व फेरीत स्टेजवर धमाल उडवून देण्यासाठी सेलिब्रिटी परीक्षक ईशा गुप्ता आणि सलमान युसुफ खान आपला नृत्याविष्कार सादर करतील, यामुळे ही फेरी अधिक प्रेक्षणीय ठरणार आहे. `ये लाल इश्क’ या छानशा रोमँटिक गाण्यावर या दोघांची केमिस्ट्री आणि नृत्य पाहायला मिळेल, या आविष्कारानंतर प्रत्येकजण स्तब्ध आणि अचंबित होणार आहे. सलमान नेहमीच आपल्या कौशल्यपूर्ण नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकतात. तर ईशा यांची मोहकता प्रेक्षकांना खिळवून ठेवते, त्यांचे नृत्य कधी थांबूच नये अशी भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण करण्यात त्या नेहमीच यशस्वी होतात. हलक्या रंगांच्या आउटफिटवर एक सुरेखशी बिंदी लावून ही अभिनेत्री हाय फिवरचं तापमान आणखी वाढवणार आहे.

ईशा गुप्ता यांचा पहिला सिनेमा पाहिल्यापासून सलमान त्यांचे चाहते झाले आहेत, ``ते अगदीच जादूई होते’’ असे ते म्हणतात. ``मी ईशाच्या सौंदर्याचा नेहमीच चाहता राहिलो आहे आणि आता तर त्यांची विनोदबुद्धी आणि व्यक्तिमत्त्वाचाही मोठा चाहता झालो आहे. सर्वांना माहीत आहे, ईशा खूप चांगल्या अभिनेत्री आहेत, तसंच सर्वोत्तम डान्सरही आहेत. हे क्षण माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय असणार आहेत, कारण त्यांनी यासारखी स्टाइल यापूर्वी कधीही सादर केलेली नाही आणि माझ्याबरोबरही त्या पहिल्यांदाच डान्स करत आहेत. त्यांच्याबरोबर डान्स करणं किती छान आहे आणि मी यासाठी &TVचे आभार मानतो,’’ सलमान म्हणाले. हा शो अंतिम फेरीपर्यंत पोचल्याबद्दल परीक्षक म्हणाले, ``हाय फिवरसाठीचा हा पीक पॉइंट आहे’’ आणि माझ्यामते व माझ्या अनुभवानुसार उपांत्य फेरीचा अॅक्ट सर्वात महत्त्वाचा असणार आहे. मला खात्री आहे, की स्पर्धक त्यांच्या ग्रूमिंगवर लक्ष केंद्रीत करत असतील आणि अंतिम फेरीसाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे काही नृत्यप्रकार त्यांचे सामर्थ्‍य दाखवणारे होते. याहीपेक्षा म्हणजे, त्यांनी आतापर्यंत पार केलेला प्रवास साजरा करणारे होते, परीक्षक म्हणून मला आशा वाटते आणि मी प्रार्थना करतो की, त्यांच्यासाठी सगळे सुरळीत होईल.