Join us

एकता कपूर आहे सिंगल मदर, अशी सांभाळते तिच्या मुलाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 11:30 IST

गत २७ जानेवारीला एकता कपूर आई बनली.

सरोगेसीद्वारे आई-बाबा बनलेले अनेक कपल बॉलिवूडमध्ये आहेत. शाहरूख खान, आमिर खान, सनी लिओनी, सोहेल खान, कृष्णा अभिषेक असे सगळे स्टार्स सरोगसीद्वारे पालक बनलेत. याशिवाय लग्न न करता सरोगसीद्वारे मुले जन्माला घालणारेही अनेक आहेत. करण जोहर, तुषार कपूर अशी नावे या यादीत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. होय, हे आहे डेलिसोप क्वीन एकता कपूर हिचे. होय, ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांची मुलगी आणि तुषार कपूरची बहीण एकता कपूर हिनेही लग्न न करता सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला आहे. एकताने अद्याप लग्न केलेले नाही. पण सरोगसीद्वारे आई बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गत २७ जानेवारीला एकता कपूर आई बनली. 

एकता कपूरच्या या बाळाचे नाव रवी आहे आणि तिला त्याच्यासोबत वेळ व्यतित करायला खूप आवडते. मुंबईत ‘कवच 2’ और ‘बेपनाह प्यार’ या मालिकांसाठी पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तिने सांगितले काम वाढल्यामुळे वेळ देता येत नाही. जेव्हा सेटवर काही समस्या असेल तेव्हाच मी सेटवर जाते. नाहीतर माझी टीम सांभाळून घेते. एका मुलाखतीत एकताने सांगितले की, ती तिचा मुलगा रवीला ऑफिसमध्ये घेऊन येते आणि त्याच्यासोबत वेळ व्यतित करते.

तिच्यानुसार, कामकाज करणारी आई असल्यामुळे सर्व गोष्टी सांभाळून घ्यावे लागतात. रवी खूप रागीट आहे. लोकांना वाटते की मी रागीट आहे पण, माझ्यापेक्षा तो जास्त रागीट आहे.एकताने रवी आणि तिचा भाचा लक्ष्यचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत रवीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.

टॅग्स :एकता कपूर