Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi : घरात रंगणार एक खून माफ नॉमिनेशन टास्क, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 12:40 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या कॅप्टनसी टास्क मध्ये नेहाने घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकावला.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या कॅप्टनसी टास्क मध्ये नेहाने घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. तर हीनाने केलेल्या चुकीची खूप मोठी किंमत तिला मोजावी लागली. या टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद आणि भांडणं झाली शिव आणि आरोहमध्ये झालेल्या झटापटीमुळे बिग बॉस यांनी कार्यासाठी दिलेल्या प्रॉपर्टीचे नुकसान झाले आणि त्यामुळेच हीना या टास्कची संचालिका असल्याने तिने दोघांदेखील बाद केले, “हीनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कॅप्टनसीच्या निर्णय प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला इम्युनिटी मिळते त्याच कार्यात केलेल्या मोठ्या चुकीची शिक्षा म्हणून बिग बॉसने  हीनाला शिक्षा दिली.

रुपालीने घराबाहेर पडल्यावर तिला एक विशेष अधिकार मिळाला त्यानुसार तिला कोणत्याही एका सदस्याला या आठवड्या मध्ये सेफ करण्याची संधी मिळाली आणि तिने हीनाला सेफ केले होते पण काल बिग बॉस यांनी ती इम्युनिटी तिच्याकडून काढून घेतली.. आज घरामध्ये एक खून माफ हा नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये सदस्य बोली लावून इतर सदस्याला नॉमीनेट करत आहेत. तेव्हा बघूया कोण कोणाला नॉमीनेट करणार ? कोण घराच्या बाहेर पडणार ? आणि कोण प्रेक्षकांनी दिलेल्या मतामुळे सेफ रहाणार. 

टॅग्स :बिग बॉस मराठी