Eisha Singh Crying: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस फेम ईशा सिंगचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ तिच्या कोणत्याही ग्लॅमरस लूकचा किंवा प्रमोशनल फोटोशूटचा भाग नसून, तिच्या चाहत्यांना काळजीत टाकणारा आहे.
ईशा सिंगने स्वतः हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती जोरजोराने रडताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर अश्रूंसोबत नाकातून रक्तही वाहताना दिसतेय. आहे. हे दृश्य पाहूनतिचे अनेक चाहते घाबरले. अनेकांनी ईशाची तब्येत ठीक आहे का, याबद्दल विचारणा केली. अखेर ईशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या व्हिडीओमागील खरी माहिती शेअर करत सर्वांची चिंता दूर केली. तिनं लिहलं, "हा व्हिडीओ माझ्या आगामी गाण्याचा भाग आहे. हे दृश्य त्या गाण्याच्या भावनिक क्षणाचे प्रतिनिधित्व करणार आहे. माझा उद्देश कोणालाही घाबरवण्याचा नव्हता".