Join us

स्वामी ओमची झाली भिकाºयांसारखी दशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 21:16 IST

​बिग बॉसचा सिझन संपला असला तरी, शोमधील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम अजूनही चर्चेत आहे. यावेळी ते वादामुळे नव्हे तर रेल्वे स्टेशनवर भिखाºयांसारखे वावरत असल्याने चर्चेत आले आहेत. स्वामी ओमची खरोखरच दयनीय अवस्था झाली की, त्यांचा चर्चेत राहण्यासाठी हा एक स्टंट आहे हे सांगणे मात्र नेहमीप्रमाणेच मुश्किल झाले आहे.

बिग बॉसचा सिझन संपला असला तरी, शोमधील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम अजूनही चर्चेत आहे. यावेळी ते वादामुळे नव्हे तर रेल्वे स्टेशनवर भिखाºयांसारखे वावरत असल्याने चर्चेत आले आहेत. स्वामी ओमची खरोखरच दयनीय अवस्था झाली की, त्यांचा चर्चेत राहण्यासाठी हा एक स्टंट आहे हे सांगणे मात्र नेहमीप्रमाणेच मुश्किल झाले आहे.त्याचे झाले असे की, दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर स्वामी ओम खुलेआम कपडे बदलत आहेत. सर्वांसमोर ते निर्लज्यपणे शर्ट काढून दुसरा शर्ट परिधान करीत असताना दिसले. त्याचबरोबर डोक्यावरील आणि दाढीवरील केसांवर कंगवाही ते फिरवत आहेत. मात्र त्यांचे हे वर्तन सेलिब्रेटीसारखे नव्हे तर भिकाºयासारखे असल्याने लोक त्यांची खिल्ली उडवित आहेत. त्यांचा हा कारनामा काही यंगस्टर्सनी मोबाइल कॅमेºयात कैद केला असून, त्याबाबतचा व्हिडीओ यू-ट्यूबवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला असून, त्यामध्ये स्वामी ओम त्यांच्या एक सहकाºयाबरोबर कपडे बदलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लोकदेखील त्यांची खिल्ली उडवित असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट होते. दरम्यान हा व्हिडीओ आतापर्यंत ८,२८,४४२ एवढ्या लोकांनी बघितला असून, लोक व्हिडीओ बघून त्यांची खिल्ली उडवित आहेत. काही तर शिव्यांची लाखोलीही वाहत असल्याने स्वामी ओमच्या वर्तनामागचा नेमका उद्देश काय? हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. स्वामी ओमच्या अशाच प्रकारच्या कारनाम्यांमुळे त्यांना नॉमिनेट न करताचा बिग बॉसच्या घरातून धक्के मारून बाहेर काढले होते. एका टास्क दरम्यान त्यांनी बानी जे आणि रोहन मेहरा यांच्या तोडांवर स्वत:ची लघवी फेकली होती. त्यामुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी घरात बाउंसर पाठवून त्यांची हकालपट्टी केली होती. घराबाहेर काढल्यानंतर स्वामी ओम मात्र विचित्र पद्धतीने वागताना दिसत आहेत. कधी सलमान खानवर आरोप, तर कधी बिग बॉस शोविषयीच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या या कारनाम्यांमुळे त्यांना लाथा-बुक्यांनी तुडविलेही आहे, परंतु स्वामी ओमच्या वर्तणुकीत अजिबात सुधारणा होत नसून, दिवसेंदिवस ते विचित्र पद्धतीने वागत असल्याचेच दिसून येत आहे.