Join us

मूल झालं की अभिनेत्रीचे करियर थांबते? सुलेखा तळवलकर म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:29 IST

Sulekha Talwalkar : लोकमत फिल्मीच्या सेलिब्रेटी किड्स या सेगमेंटमध्ये सुलेखा तळवलकर यांनी त्यांची दोन्ही मुलं आर्य आणि टियासोबत हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुलं झाल्यानंतर अभिनेत्रींचं करिअर थांबतं का, यावर आपलं मत व्यक्त केलं.

सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी मालिका आणि चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या त्या मुरांबा आणि सावळ्यांची जणू सावली या मालिकेत काम करताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांनी मुल झाल्यानंतर अभिनेत्रींचं करिअर थांबतं का, यावरदेखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

लोकमत फिल्मीच्या सेलिब्रेटी किड्स या सेगमेंटमध्ये सुलेखा तळवलकर यांनी त्यांची दोन्ही मुलं आर्य आणि टियासोबत हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुलं झाल्यानंतर अभिनेत्रींचं करिअर थांबतं का, यावर आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या की,''एक अभिनेत्री म्हणून मुलं होऊ द्यायची नाही. किंवा अरे बापरे आता मुलं झाली तर माझं करिअर थांबेल. हे ध्यानीमनी पण नाही गं मला हेच करायचं होतं आणि मध्ये मध्ये करिअर पण आलं. मी माझ्या आर्यच्या जन्मानंतर तीन वर्ष ब्रेक घेतला. टियाच्या जन्मानंतर तीन वर्ष ब्रेक घेतला.'' 

सुलेखा तळवलकर पुढे म्हणाल्या की, ''सासूबाईंच्या आजारपणासाठी दोन वर्षाचा ब्रेक घेतला आणि ते मी आनंदाने केलं. मला कोणी बळजबरी केली नाही. किंवा तळवलकरांनी सुद्धा कोणी मला सांगितलं नाही. हे तू करायला पाहिजेस. ते माझ्या आनंदासाठी मी केलं. कारण मला असं वाटतं हेच माझं करियर आहे.''