Join us
Daily Top 2Weekly Top 5

'होणार सून मी ह्या घरची'मधील चिमुरडी ओवी आठवतेय ना?, आता दिसते अशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 06:00 IST

२०१३ साली प्रसारीत झालेली होणार सून मी ह्या घरची मालिका खूप लोकप्रिय झाली होती.

छोट्या पडद्यावर २०१३ ते २०१६ या कालावधीत प्रसारीत झालेली होणार सून मी ह्या घरची मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. तसेच या मालिकेतील बालकलाकार ओवीदेखील आठवतेय ना. तिने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. तिला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही देण्यात आला होता. आता ओवी काय करते हे अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे 

होणार सून मी ह्या घरची मालिकेत ओवीचे पात्र साकारले होते बालकलाकार क्रितीना वर्तकने. क्रितीना एक मॉडेल असून अनेक व्यावसायिक जाहिराती तसेच एक बालकलाकार म्हणून मराठी चित्रपट, मराठी- हिंदी मालिकेत तिने काम केले आहे.

शशांक केतकर सोबत झी युवावरील इथेच टाका तंबू या आणखी एका मालिकेतून तिने काम केले होते. तर कनिका, द शैडो यासारख्या भयपटात तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हिरवी या मराठी सिनेमातही तिने काम केले.

याशिवाय स्टार प्रवाहवरील गोठ (मालिकेतील बालपणीची राधा) , डर, गर्ल्स ऑन टॉप, सावधान इंडिया, लक्ष्य, शपथ, जोधा अकबर अशा अनेक हिंदी मराठी मालिकेतून तिने छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.

मालिकांसोबतच क्रितीनाने बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिम, ताज ग्रुप, एस.बी.आय, विवा इलेकट्रोनिक शोरूम अशा अनेक जाहिरातींसाठी काम केले आहे. 

क्रितीना सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून ती चंदाची सावत्र बहीण म्हणून एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.