Join us

'सुवासिनी' मालिकेतील ही अभिनेत्री आठवतेय का?, आता दिसते खूप ग्लॅमरस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 07:00 IST

आता या अभिनेत्रीला ओळखणं कठीण झालं आहे.

छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका भेटीला येत असतात आणि त्यातून बरेच कलाकार प्रेक्षकांच्या समोर येतात. या मालिकांमध्ये काम करता करता हे कलाकार कधी प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात. ते प्रेक्षकांच्या मनात घर करतात. मालिकेत बालकलाकारदेखील काम करताना दिसतात. तेदेखील आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे स्टार प्रवाहवरील सुवासिनी. ही मालिका २०११ साली भेटीला आली होती. या मालिकेत सवीची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या तुपे हिने साकारली होती. ही मालिका संपून आता बरीच वर्षे उलटली आहे आणि आता अभिनेत्री ऐश्वर्यालाही ओळखणं कठीण झालं आहे. 

अभिनेत्री ऐश्वर्या तुपे ही मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. सुवासिनी मालिकेत तिने साकारलेल्या सुवीने रसिकांच्या मनात घर केले आहे. आजही ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. मात्र आता तिच्यात खूप बदल झाला असून तिला ओळखणं खूप कठीण झालं आहे.

खऱ्या आयुष्यात ऐश्वर्या खूपच ग्लॅमरस दिसते आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असून तिने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्यात झालेला बदल पाहायला मिळतो. 

ऐश्वर्या तुपेने मालिकेशिवाय बापमाणूस मालिकेत तिने काम केले आहे. खोपा, नटी आणि मोकळा श्वास या चित्रपटातही ती झळकली आहे. सध्या ती मालिकेत किंवा चित्रपटात काम करताना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.