Join us  

दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी सदैव मंगलम, घाडगे & सून, हे मन बावरे, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांमध्ये घडणार या घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 9:00 AM

घाडगे सदन, देशमुख - निंबाळकर कुटुंब, लक्ष्मी सगळ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांना दिवाळीची तयारी बघायला मिळणार आहे.

दिवाळी जवळ आली की, सगळीकडे आनंदमय वातावरण असते ... कंदील, रांगोळी, फटाके, उटणे  दिव्यांची आरास, फराळ सगळी तयारी सुरू होते... कलर्स मराठीवर देखील प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांमध्ये दीपावली विशेष भाग रंगणार आहे. घाडगे सदन, देशमुख - निंबाळकर कुटुंब, लक्ष्मी सगळ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांना दिवाळीची तयारी बघायला मिळणार आहे. लक्ष्मी सदैव मंगलम मालिकेमध्ये दिवाळीचा प्रत्येक दिवस मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. पहिली आंघोळ, लक्ष्मी पूजन, धनत्रयोदशी... अजिंक्य – लक्ष्मी आणि संपूर्ण कुटुंब मिळून फराळ, कंदील सोबतच किल्ला देखील बनवणार आहे. सध्या लक्ष्मी आणि अजिंक्य मध्ये अबोला आहे कारण, अजिंक्यने त्याच्या मनातील भावना लक्ष्मीला सांगितल्या आहेत आणि त्यामुळे लक्ष्मीने अजिंक्यशी बोलणे बंद केले आहे... परंतु परंतु पाडव्याची दिवशी लक्ष्मीने मल्हारला पहिल्यांदा ओवाळावे अशी मागणी मल्हार करणार आहे ... मल्हारच्या अशा वागण्याने लक्ष्मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे की, मल्हार असा का वागत आहे. आता लक्ष्मी मल्हारला ओवाळणार का? अजिंक्य लक्ष्मीची समजूत काढू शकेल का? आणि दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा अजिंक्य आणि लक्ष्मीमध्ये मैत्री होईल का? हे बघणे रंजक असणार आहे...

घाडगे & सून मालिकेमध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अक्षय आणि कियारा घाडगे सदन मध्ये येणार आहेत. काही दिवसांपासून मालिकेमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. कुठेतरी अक्षयच्या मनामध्ये अमृताविषयी प्रेमाची भावना निर्माण होऊ लागली आहे. अक्षय आणि कियाराचा हा पहिला पाडवा असल्याने घाडगे सदन मध्ये तो देखील साजरा केला जाणारा आहे. परंतु हे होत असताना अमृता जरा नाराज आहे कारण तिला मागील वर्षीच्या पाडव्याची आठवण येत आहे. माई आणि अण्णांनी अक्षयला माफ केले असून आता हे दोघे देखील घाडगे परिवारासोबत राहाणार आहेत. अक्षय परत घाडगे सदन मध्ये परतल्यामुळे अमृताने घेतलेले आव्हानं तिने पूर्ण केले आहे. अक्षय आणि कियारा आता घरी परतल्यावर अमृता घाडगे सदन मध्ये राहाणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकमध्ये देखील दिवाळी साजरी होणार आहे. संयोगीता आणि सिद्धार्थची भाऊबीज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तसेच दिवाळीच्या निमित्ताने सिद्धार्थ पहिल्यांदा अनुच्या घरी जाणार आहे. तिथे गेल्यावर काय होईल? हे प्रेक्षकांना मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. 

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेम आणि राधा मोठ्या उत्सहात दिवाळी साजरी करणार आहेत. परंतु माधुरीची तब्ब्येत अचानक बिघडल्यामुळे प्रेम आणि माधुरी न्युझीलंडला जाणार आहेत. दीपिका राधा आणि देशमुख–निंबाळकर कुटुंबाला बऱ्याच गोष्टी सुनावणार आहे. नक्की दीपिकाच्या मनामध्ये काय सुरू आहे? कुठलं नवं कारस्थान ती राधा–प्रेमच्या विरोधात रचणार आहे? राधा या संकटावर कशी मात करेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेमध्ये मिळणार आहेत.

टॅग्स :कलर्स मराठीघाडगे अँड सूनलक्ष्मी सदैव मंगलम्हे मन बावरेराधा प्रेम रंगी रंगली