Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 18:29 IST

छोट्‌या पडद्यावरील लाडकी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी स्टार प्लसवरील ‘दि व्हॉईस’मध्ये अगदी पूर्णपणे नवीन भूमिकेत दिसून येणार आहे.

ठळक मुद्देदिव्यांका त्रिपाठी पहिल्यांदाच करणार सूत्रसंचालन

छोट्‌या पडद्यावरील लाडकी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी स्टार प्लसवरील ‘दि व्हॉईस’मध्ये अगदी पूर्णपणे नवीन भूमिकेत दिसून येणार आहे. ह्या शोबद्दल सर्वत्र भरपूर चर्चा असून त्यांनी भारतातील सर्वांत मोठे संगीतकार ए आर रेहमान यांना सुपर कोचच्या रूपात आणले आहे. दिव्यांका ह्या सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

सूत्रांनुसार, हरहुन्नरी अभिनेत्री दिव्यांका ‘दि व्हॉईस’साठी सूत्रसंचालन करणार आहे आणि आम्ही याबद्दल खूपच उत्साहात आहोत. ती प्रथमच सूत्रसंचालन करणार असून ती ते उत्तम प्रकारे करेल यात शंका नाही. एक सूत्रधार म्हणून आपल्या सौंदर्य आणि विनोदबुद्धीचा ती पुरेपूर वापर करेल. प्रेक्षकांना ती अगदी नव्या अवतारात दिसून येईल. स्टारप्लसवरील ‘दि व्हॉईस’ची निवेदिका म्हणून दिव्यांका त्रिपाठीला पाहणे खरोखरीच रोचक ठरेल. हा शो प्रत्येक दिवसागणिक अधिकाधिक मोठा होत चालला असून प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरत आहे.

जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. भारतातील उत्कृष्ट गायकांचा शोध घेण्यासाठी द व्हॉइस या कार्यक्रमात केवळ उत्कृष्ट आवाजाच्या दर्जावरच भिस्त ठेवली जाणार असून त्यात जात-पात, लिंग, धर्म, भाषा, प्रादेशिकता वगैरे कोणतेही भेद केले जाणार नाहीत.

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीद व्हॉइस शो