बिग बॉस या शोमध्ये भांडण तंटे होताना दिसतात. पण फार क्वचितच ही भांडणं वेगळ्या पातळीवर जातात आणि स्पर्धकांचा तोल जातो. याआधीही 'बिग बॉस'मध्ये विशेषतः 'बिग बॉस मराठी'मध्ये अशा घटना घडल्या आहेत.
दुसऱ्या सीझनमध्ये पराग कान्हेरेची हकालपट्टी असो, पाचव्या सीझनमध्ये आर्या जाधवला घराबाहेर काढणं असो की नुकत्याच सुरु असलेल्या सीझनमध्ये दिव्या शिंदे घराबाहेर जाणं असो... रागाच्या भरात प्रत्येक सदस्याला 'त्या' एका क्षणावर मात करता आली नाही, आणि त्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला. दिव्या शिंदेच्या बाबतीतही तेच झालं.काय घडलं होतं नेमकं?एकमेकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाची फुली मारुन टास्क खेळायचा होता. सुरुवातीपासून अशा टास्कमध्ये दिव्याला टार्गेट केलं जात होतं, असं ती सांगत आली आहे. त्यामुळे या वेळीही असंच काहीसं झालं होतं. त्यामुळे दिव्या आधीच चिडलेली असणार हे उघड होतं. अशातच जेव्हा तन्वीने दिव्या बाहेरच्या गोष्टी बोलते, तिला रात्री झोप लागत नाही, सकाळी मग ती तब्येतीची कारणं देते, हे ऐकल्यावर दिव्याचा पारा आणखी चढला.तरीही तिने शांतपणे तन्वीला उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मुळात कळत नकळतपणे दिव्या बाहेरच्या गोष्टी सदस्यांशी शेअर करत असेलही. पण त्याचा मुद्दा असा उपस्थित होईल, याची तिला कल्पना नव्हती. तन्वीला उत्तरं देताना दिव्या प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलत होती. हे इतर सदस्यांना खटकत होतं. तरीही बिग बॉसने यात हस्तक्षेप केला नाही.
Web Summary : Divya Shinde's eviction from Bigg Boss Marathi 6 stemmed from a heated argument during a task. Despite warnings and opportunities to apologize, her refusal to back down led to her expulsion, ending her journey on the show.
Web Summary : टास्क के दौरान गरमागरम बहस के कारण दिव्या शिंदे को बिग बॉस मराठी 6 से बाहर कर दिया गया। चेतावनियों और माफी मांगने के अवसरों के बावजूद, पीछे हटने से इनकार करने पर उन्हें निष्कासित कर दिया गया, जिससे शो में उनकी यात्रा समाप्त हो गई।