Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून हेमंत ढोमेने मानले ‘या’ देवाचे विशेष आभार… जाणून घ्या काय घडलं?

By सुवर्णा जैन | Updated: August 2, 2019 06:30 IST

ये रे ये रे पैसा २ या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. तर पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांचं आहे.

बिग बी आणि महानायक अमिताभ बच्चन हे मराठी चित्रपटाचे चाहते आहेत हे सर्वश्रुत आहेत. वेळोवेळी ते मराठी चित्रपट आणि मराठी कलाकारांवरील प्रेम विविध माध्यमांमधून व्यक्त करत असतात. नुकतंच बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरसह बिग बींनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्यात. आजपर्यंत मराठी चित्रपटात न दिसलेली भव्यता आणि चकचकीतपणाही या चित्रपटात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखीच वाढलं आहे. लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद. हे सगळं हिंदी सिनेमात पाहायला मिळतं. "ये रे ये रे पैसा २" या मराठी  चित्रपटात अशीच भव्यता आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे. 

 

या शुभेच्छांमुळे 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे भारावून गेला आहे. बिग बींच्या या शुभेच्छांना हेमंतने रिप्लाय दिला आहे. “याहून मोठा आशीर्वाद नाही… धन्यवाद देवा…”अशा शब्दांत हेमंतने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. तर पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांचं आहे. 

 

या चित्रपटात अभिनेता संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनये रे ये रे पैसा २