Join us
Daily Top 2Weekly Top 5

डीआयडी लिटिल मास्टर्सच्या सेटवर 'मैं शायर तो नहीं गाण्याद्वारे' ऋषी कपूरने चित्रांगदा सिंहवर केली जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 11:47 IST

झी टीव्हीवरील लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणा-या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या ...

झी टीव्हीवरील लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणा-या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत.आता स्पर्धेच्या या टप्प्यात प्रेक्षकांनी केलेले मतदान आणि श्रोत्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी टॉप 12 स्पर्धक अटीतटीचा प्रयत्न करीत आहेत. येत्या शनिवारी,5 मे रोजी प्रेक्षकांना एक नेत्रदीपक पर्वणी मिळेल; कारण महान अभिनेता अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे दोघेही आपल्या ‘102 नॉट-आऊट!’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’च्या व्यासपिठावर उपस्थित असतील.



लहानपणापासून ज्या नायकाबद्दल विशेष आकर्षण वाटले तो ऋषी कपूर प्रत्यक्ष समोर आलेला पाहून आणि त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेली परीक्षक चित्रांगदा सिंह म्हणाली की लहानपणी आपण त्याच्या प्रेमात पडलो होतो.चित्रांगदा सिंह म्हणाली, “मी ‘बॉबी’ चित्रपट पाहिल्यावर ऋषी कपूरच्या प्रेमात पडले होते आणि त्यात तो ‘मैं शायर तो नहीं’ हे गाणे गात असताना तो जिच्यासाटी हे गाणे गातो, ती तरुणी आपणच असावं अशी माझ्या मनात तेव्हा तीव्र इच्छा निर्माण झाली होती. तेव्हापासून मला ऋषीसर आवडू लागले आणि मी त्यांचा जवळपास प्रत्येक चित्रपट पाहिला असून एक दिवस आपण ते गाणं ऋषीसरांबरोबर अनुभवावं हे माझं स्वप्न होतं.”तिची ही विनंती तात्काळ स्वीकारून ऋषी कपूरने व्यासपिठावर प्रवेश केला आणि तिच्यासोबत हे गाणे गाण्यास सुरुवात केली. 1970 आणि 80 च्या दशकात आपल्या ज्या शैलीमुळे ऋषी कपूर तरुणींचा आवडता हिरो बनला, तीच शैली त्याला आताही उत्साहाने साकारताना पाहून अन्य परीक्षक, स्पर्धक आणि प्रेक्षकांना राहावले नाही आणि त्यांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली.आता या स्पर्धेच्या काहीशा अवघड टप्प्यांत प्रवेश करणार्‍या ब्लॉकबस्टर बच्चे कंपनीने या वीकेण्डच्या कार्यक्रमाची सुरुवात अप्रतिम नृत्याविष्कार सादर करून केली. या भागात ते आपल्या स्किपर्सच्या जोडीने आपले नृत्य सादर करताना दिसतील. सर्वात लहान ब्लॉकबस्टर बच्ची असलेल्या उर्वा भावसारने दंगल चित्रपटातील नैना गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले; तर एपी रॉकर्स या नृत्यचमूने गणपती बाप्पा मोरयाच्या तालावर सारे व्यासपीठ दणाणून सोडले. रोहनने लैलाच्या तालावर सर्वांना डोलविले, तर चुरा के दिल मेरा च्या ठेक्यावर मन आणि अमित या जोडीने सर्वांना भारावून टाकले.