Join us
Daily Top 2Weekly Top 5

सादिया सिद्दिकीचा स्विम सूटमधील फोटो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 17:26 IST

सादिया सिद्दिकीने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. कभी हा कभी ना या चित्रपटापासून तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात ...

सादिया सिद्दिकीने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. कभी हा कभी ना या चित्रपटापासून तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने बनेगी अपनी बात, बालिकावधू, ससुराल गेंदा फूल यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या ती स्टार प्लसवरील तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेत काम करत आहे. या मालिकेचे नुकतेच चित्रीकरण बँकॉक येथे झाले. या शोमध्ये आता एक नाट्‌यमय वळण येत असून प्रेक्षकांना सर्वच व्यक्तिरेखा वेगळ्‌या रूपात पाहायला मिळणार आहेत.सादिया सिद्दिकी ही या मालिकेत कायम साडीत दिसून आली असून आगामी भागांमध्ये प्रथमच ती थेट स्विम सूटमध्ये दिसून येणार आहे. या दृश्यांसाठी तिने अतिशय शिस्तबद्ध डाएट राखून सुडौल फिगर दिसण्यासाठी व्यायाम केला. “जेव्हा तुम्ही साडी नेसता, तेव्हा फिगरबद्दल फारसे कळून येत नाही, पण स्विमसूटमध्ये चांगले दिसायला छान फिगरच हवी. जेव्हा मला सांगण्यात आले की मला स्विम सूट घालायचा आहे, तेव्हा लगेचच मी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला सुरुवात केली. माझ्या डाएटमध्ये सुधारणा केली. अर्थात मी माझ्या निर्मात्यांना सांगितले की, मी काही सनी लिओनी नाही त्यामुळे मी काही एकदम छोटा स्विमिंग सूट घालू शकत नाही. तसेच एकदम फिट दिसू शकत नाही,” असे सादिया हसत सांगते.सादियाने आपल्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले असून मालिकांमध्ये बोल्ड लूक किंवा दृश्ये देण्यामध्ये ती कधीही लाजलेली नाहीये. बनेगी अपनी बात ही पहिली अशी मालिका होती, ज्यात चुंबनदृश्य होते आणि आपल्या काळापेक्षा ते खूपच पुढचे होते. या मालिकेत तिने अल्ट्रा मॉडर्न पोशाख देखील घातले होते. हल्लीच मालिकांमध्ये ती पारंपारिक रूपात दिसून येत आहे. आता या शोमध्येही आधुनिक पोशाखांबद्दल ती आनंदात आहे. या ट्रान्सफॉर्मेशनचे कारण तिला ठाऊक नाही पण तिची व्यक्तिरेखा आता पारंपारिक रूपातून आधुनिक रूपात दिसून येईल, कदाचित त्यामुळे प्रेक्षकांना तिची व्यक्तिरेखा जास्त आपलीशी वाटेल,” असे तिला वाटत आहे.Also Read : तू सुरज मैं सांज पियाजी फेम मधुरा नाईकचा हॉट अवतार