Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मेरे साई या मालिकेतील अबीर सुफीची नवी मैत्रीण तुम्ही पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:21 IST

मेरे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई ...

मेरे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई बाबांच्या आयुष्यातील अनेक घटना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत साईंची भूमिका अबीर सुफी, झिपरीची भूमिका धृती मंगेशकर साकारत आहे. तसेच तोरल रासपुत्र, वैभव मांगले यांसारखे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. अबीर सूफी, तोरल रासपुत्र आणि वैभव मांगले या मुख्य कलाकारांच्या कलात्मक अभिनयामुळे मालिकेने लोकांची मने जिंकली आहेत. आता या मालिकेच्या टीममध्ये अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर दाखल होणार आहेत. सुप्रिया या मालिकेत एका अगदी वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या सेटवर नेहमीच दंगा-मस्ती सुरू असते. ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असल्याने या मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबासारखी झाली आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. या मालिकेत साई बाबांची भूमिका साकारणाऱ्या अबीर सुफीला तर या मालिकेच्या सेटवर खूप चांगली मैत्रीण भेटली आहे. या मैत्रिणीला सोडून अबीर काही क्षण देखील राहू शकत नाही. ही मैत्रीण सेटवर सतत अबीर सोबतच असते. मेरे साई या मालिकेच्या सेटवर एक छोटेसे वासरू आहे. हे वासरू ब्राऊन रंगाचे असून हे खूपच गोड आहे. याचे नाव लक्ष्मी असून ही लक्ष्मी अबीरची लाडकी मैत्रीण बनली आहे. लक्ष्मी आता या मालिकेच्या सेटवर सगळ्यांची लाडकी बनली आहे. या मालिकेतील सगळ्यांना प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम आहे. अनेकांच्या घरात पाळलेले प्राणी आहेत. पण एखाद्या वासरूचा सांभाळ करण्याचा अनुभव सगळ्यांसाठी वेगळा आहे. त्यामुळे अनेक जण या लक्ष्मीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतात. हे कलाकार वासराला डॅापरने दूध पाजतात. तसेच तिच्यासोबत खेळतात. अबीर सांगतो, मला थकवा आला असेल किंवा माझी चिडचिड होत असेल तर लक्ष्मीसोबत वेळ घालवल्यानंतर क्षणात माझा थकवा दूर होतो. तिच्यामुळे आमच्या सेटवर एक वेगळेच वातावरण असते. Also Read : ​​मेरे साईच्या टीमला एका फॅनकडून मिळाली अनोखी भेटवस्तू