Join us

धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:44 IST

आदित्य नारायण धनश्रीला विचारतो, 'घटस्फोट होऊन किती दिवस झाले?'

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची एक्स वाईफ धनश्री वर्मा डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. सध्या ती 'राईज अँड फॉल' या रिएलिटी शोमध्ये दिसत आहे. यात तिने अनेकदा युजवेंद्र चहलसंदर्भात, घटस्फोटासंदर्भात भाष्य केलं. तसंच इतर सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. घटस्फोटाच्या दिवशी  कोर्टात युजवेंद्रने घातलेल्या टीशर्टवरुनही तिने नाराजी व्यक्त केली होती. तर आता पहिल्यांदाच धनश्री पोटगीच्या चर्चांवर ऑन कॅमेरा बोलली आहे.

राईज अँड फॉल शोमध्ये धनश्री वर्मा, आदित्य नारायण, कुब्रा सैत बोलत असतात. तेव्हा आदित्य नारायण धनश्रीला विचारतो, 'घटस्फोट होऊन किती दिवस झाले?' यावर धनश्री म्हणाली,'ऑफिशियल घटस्फोट होऊन आता जवळपास एक वर्ष झालं.' कुब्रा सैत म्हणाली,'तसं पाहायला गेलं तर खूप लवकर झालं तुमचं'. तेव्हा धनश्री वर्मा म्हणाली, 'हो प्रक्रिया लवकर झाली कारण हे आपसी सहमतीने होतं. म्हणून लोक जेव्हा पोटगीबद्दल बोलतात ते चुकीचं आहे. मी शांत आहे म्हणून तुम्ही काहीही बोलणार का. पण ठिके मला आईवडिलांनी हेच शिकवलं आहे की जे तुझे लोक आहेत, ज्यांची तुला काळजी आहे त्यांनाच तू उत्तरं द्यायला बांधील आहेस."

 धनश्री आणि चहल २०२० मध्ये भेटले आणि त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले. पण २०२३ मध्ये त्यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या आणि अखेर फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. धनश्रीने कोट्यवधींची पोटगी घेतल्याचीही चर्चा झाली. त्या सर्व चर्चांवर अखेर तिने उत्तर दिलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dhanashree Verma addresses alimony rumors post-divorce from Yuzvendra Chahal.

Web Summary : Dhanashree Verma, Yuzvendra Chahal's ex-wife, addressed alimony rumors, clarifying that their divorce was mutual. She emphasized her parents taught her to respond only to those she cares about, dismissing public speculation about the settlement.
टॅग्स :युजवेंद्र चहलसेलिब्रिटीघटस्फोट