'बिग बॉस'च्या घरातून एक धक्कादायक एलिमिनेशन करण्यात आलं आहे. रुचिता ही टॉप ५ पैकी एक स्पर्धक मानली जात होती. या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले होते. ज्यामध्ये दिपाली सय्यद, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. रुचिता बिग बॉसच्या घरातून बाद झाल्याचं कळाल्यानंतर 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक धनंजय पोवारनं नाराजी व्यक्त केली आहे.
धनंजय पोवारनं रुचिताच्या एलिमिनेशनवर नाराजी व्यक्त करत व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तो म्हणाला, "बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर बघायला मिळालं की, रुचिता बाहेर पडल्या. पण, मला असं वैयक्तिक वाटतंय की या अगोदर रोशन भजनकरला खूप मतं होती. रोशन भाऊ बाहेर गेले आणि आता रुचिता बाहेर गेली. रुचिता कन्टेन्ट देतेय, मागचा आठवडा पूर्ण रुचिताने कन्टेन्ट दिलेला आहे. मग तरीही रुचिता बाहेर गेली? घराच्या". हा व्हिडीओ शेअर करत धनंजयने "हे काही पटलं नाही" असं कॅप्शन लिहिलं आहे.
दरम्यान, रुचिताने घराबाहेर आल्यावर पोस्ट लिहून प्रेक्षकांची माफी मागितली. रुचिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सांगितलं की, ''बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्या बद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्या बद्दल खूप खूप आभार!''.
Web Summary : Ruchita's eviction from Bigg Boss shocked many. Dhananjay Powar questioned her elimination despite providing good content. Ruchita apologized to viewers for her mistakes, accepting the public's decision with gratitude for the support she received during her journey.
Web Summary : बिग बॉस से रुचिता के बाहर होने से कई लोग हैरान हैं। धनंजय पवार ने अच्छी सामग्री देने के बावजूद उनके निष्कासन पर सवाल उठाया। रुचिता ने अपनी गलतियों के लिए दर्शकों से माफी मांगी और अपनी यात्रा के दौरान मिले समर्थन के लिए आभार व्यक्त किया।