Join us  

BB15: Devoleena ने घेतला बिचुकलेच्या हाताला कडकडून चावा; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 4:30 PM

Bigg boss 15: देवोलीना आणि अभिजीत यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो 'बिग बॉस १५' (bigg boss 15) चा ग्रँड फिनाले येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी या घरातील प्रत्येक स्पर्धक कसोशीने प्रयत्न करत आहे.यामध्येच गेल्या काही दिवसांपासून देवोलीना भट्टाचार्जी (devoleena) - अभिजीत बिचुकले (abhijeet bichukale) आणि तेजस्वी प्रकाश (tejasswi prakash)- शमिता शेट्टी (shamita shetty) या चौघांमध्ये परस्परांमध्ये वाद होतांना दिसत आहेत. परंतु, आता देवोलीना आणि अभिजीत यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. सध्या सोशल मीडियावर या शोचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात देवोलीनाने चक्क अभिजीतच्या हाताचा चावा घेतला आहे. 

कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये टिकट टू फिनाले टास्कमध्ये देवोलीना, अभिजीत बिचुकलेच्या हाताला जोरात चावते. त्यामुळे संतापलेला अभिजीत तिला मारण्यासाठी चक्क दगड उचलतो. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये टिकट टू फिनाले जिंकण्यासाठी घरातल्या सदस्यांना एक टास्क देण्यात आलेला आहे. यात बिचुकले देवोलीनाच्या हातात असलेले बॉल खेचण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे देवोलीना त्याला जोरात चावते. देवोलीनाने केलेल्या या कृतीमुळे अभिजीत प्रचंड संतापतो आणि तिला घरातून बाहेर काढा अशी मागणी करतो. इतकंच नाही तर तो थेट  जमिनीवर पडलेला दगड उचलतो आणि तिला मारायला धावतो.

दरम्यान, या प्रकारानंतर घरातील सगळेच जण गोंधळून जातात. तर रश्मी दुसरीकडे बिचुकलेंना थांबवण्याचा प्रयत्न करते. आता निर्माण झालेल्या या वादावर सलमान खान कोणती प्रतिक्रिया देणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

टॅग्स :बिग बॉसअभिजीत बिचुकलेदेवोलिना भट्टाचार्जीटिव्ही कलाकार