Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवमाणूस 2'ची नाही तर आतुरता फक्त सुरू आजीच्या म्हणींची, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 12:54 IST

Devmanus मालिकेच्या पहिल्या भागातही सरु आजीने चाहत्यांचे आपल्या खास अंदाजाने चांगलेच मनोरंजन केले होते.सरु आजीच्या तोंडी असलेल्या म्हणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.इतकंच काय तर त्यावर भन्नाट मीम्सही बनवण्यात आले होते.

'देवमाणूस 2' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका हा 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मालिकेचा दुसऱ्या भागाचा टिझर प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिला आणि सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आलं. हा नवीन सीजन लवकरचं सुरू होणार असून यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना असताना सरु आजीनं मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ''जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येतेय म्हणत सोशल मीडियावर सरु आजीचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 

मालिकेच्या पहिल्या भागातही सरु आजीने चाहत्यांचे आपल्या खास अंदाजाने चांगलेच मनोरंजन केले होते. सरु आजीच्या तोंडी असलेल्या म्हणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.इतकंच काय तर त्यावर भन्नाट मीम्सही बनवण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरु आजीचा तोच अंदाज पाहायला मिळणार असल्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

सोशल मीडियावर हा प्रोमो प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत सरु आजीच्या प्रोमोला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रोमोला मिळणारी पसंती पाहता, मालिकेलाही रसिकांची पंसती मिळणार असल्याची शक्यता आहे. तुर्तास सरु आजी सोशल मीडियावर पुन्हा एकदा हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.