Join us

‘नमूने’मध्ये देवेन भोजानीची होणार एंट्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 09:36 IST

आगामी भागात लग्नाची रेलचेल मालिकेत पाहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावर नुकतीच भेटीला आलेली 'नमूने' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंतीस मिळवण्यात मालिकेला यश मिळाले आहे.नमुनेमध्ये वेगेवगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने मांडले असल्यामुळे रसिकांची पसंती मिळत आहे.आगामी भागात लग्नाची रेलचेल मालिकेत पाहायला मिळणार आहे.

नमूनेच्या आगामी भागात निरंजन (कुणाल कुमार) आपल्या भाचीच्या लग्नाचे सारे नियोजन करण्यात अत्यंत निर्णायक भूमिका बजावण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळणार आहे. परंतु मामा मुरारी (देवेन भोजानी)च अखेर या सगळ्यामध्ये निर्णायक भूमिका बजावतो.मामा या नात्याने आपल्या भाचीच्या लग्नाबाबत निरंजन खूपच उत्साहात आहे आणि तिच्या लग्नाचं संपूर्ण नियोजन आणि व्यवस्था करण्यामध्ये अगदी मोलाची कामगिरी बजावण्याचा निश्चय त्याने केला आहे. परंतु आपल्या बहिणीच्या घरी त्याला मुरारी आडवा येतो. या मुरारीने लग्नाचं नियोजन स्वतःच करायचा घाट घातलेला आहे, आपल्या आत्मविश्वासपूर्ण वावराने साऱ्या कुटुंबाचा विश्वास जिंकून घेतला आहे आणि लग्नाची सगळी सूत्र स्वतःकडे घेतली आहेत.

 

अगदी हेअर पिन खरेदी करण्यापासून ते लग्नाच्या कपड्यांची खरेदी करण्यापर्यंत सगळं काही मुरारीच्या सूचनांनुसार सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे निरंजन अस्वस्थ झाला असून वधूचा मामा म्हणून असलेला आपला अधिकार हिरावून घेतला जात असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली आहे.

पुढे घडणाऱ्या घटना मुरारीबद्दलचे विचार आमूलाग्र बदलायला निरंजनला भाग पाडतील का? या मालिकेतील देवेन भोजानीच्या पात्राबाबत बोलताना कुणाल कुमार म्हणाला,“नमूनेच्या सेटवर आमच्यासोबत चित्रीकरण करण्यासाठी देवेन भोजानी आल्यामुळे आम्ही सगळे अतिशय आनंदित झालो. देवेन यांचे मुरारी हे पात्र पु. ल. देशपांडे यांच्या नारायण या ‘वल्ली’ नमुन्यावर आधारलेले आहे. मुरारी हा एक अगदी सरधोपट इसम आहे ज्याला प्रकाशझोतात यायची अजिबात हौस नाही आणि आपल्या स्वतःच्या विश्वातच मश्गुल होऊन राहायला त्याला आवडतं. देवेन भोजानी यांच्यासारख्या गुणवान कलाकारासोबत काम करणे हा नेहमीच सुरेख अनुभव असतो आणि आम्ही जे देऊ करतोय ते प्रेक्षकांना देखील खूप आवडेल अशी आम्हाला आशा आहे.”