Join us  

क्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 7:15 AM

स्टार प्लसवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'इश्कबाझ'च्या कथानकाचा काळ लवकरच एका पिढीने पुढे नेला जाणार आहे.

ठळक मुद्दे'इश्कबाज'मध्ये आता एका पिढीची घेणार झेप'इश्कबाज'मध्ये क्रिस्टल डिसुझाची होणार एन्ट्री

स्टार प्लसवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'इश्कबाझ'च्या कथानकाचा काळ लवकरच एका पिढीने पुढे नेला जाणार आहे. यानंतर शिवाय आणि अनिका यांचा मुलगा शिवांश हा हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठा लोकप्रिय स्टार झालेला दिसेल. तसेच रूपसुंदर अभिनेत्री क्रिस्टल डिसुझा हिचाही समावेश मालिकेत होणार आहे.'इश्कबाझ'मध्ये क्रिस्टल डिसुझा ही लोकप्रिय अभिनेत्री एका अगदीच भिन्न रूपात दिसेल. निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या सूत्रांनी सांगितले, क्रिस्टल डिसुझाला या मालिकेत प्रवेश देण्यासाठी निर्माते उत्सुक आहेत. पण अन्य मालिका आणि इतर कामांमध्ये ही अभिनेत्री व्यग्र असल्याने तिच्याकडून अद्याप होकार आलेला नाही. पण तिचा होकार मिळविण्यात निर्माते यशस्वी झाल्यास इश्कबाझसारख्या मालिकेत क्रिस्टल डिसुझाला पाहणे ही प्रेक्षकांसाठी नेत्रपर्वणीच ठरेल. दरम्यान, आता शिवांशची भूमिका कोणता अभिनेता साकारणार आहे, याविषयी या मालिकेच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.'इश्कबाज'मध्ये आता एका पिढीची झेप घेण्यात येणार आहे. ह्या झेपेसाठीच्या प्रोमोचे अनावरण करण्यात आले असून आता ह्या मालिकेत प्रणयाच्या मसाल्यासह बॉलिवूडचा तडका देण्यात येणार आहे. 'इश्कबाज' मालिकेतील प्रोमोमधून शिवाय नकुल मेहता आणि अनिका सुरभि चंद्रा यांचा मुलगा शिवांश बॉलिवूडमधील सुपरस्टारच्या रूपात प्रवेश करेल. ह्या रोमांचक प्रोमोमध्ये शिवाय आणि अनिका हे आपल्या शिवांश ह्या मुलाबद्दल बातचीत करताना दिसून येतील. बॉलीवूडच्या पार्श्वभूमीवरील दृश्यात ह्या सुपरस्टारला पाहून वेडी झालेली गर्दीसुद्धा दिसून येईल. शिवांशची भूमिका कोण साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात असून प्रेक्षक ते शोधून काढण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :इश्कबाज मालिका