Join us
Daily Top 2Weekly Top 5

Confirmed! झी मराठीवरील मन झालं बाजिंद घेणार प्रेक्षकांचा निरोप, यादिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:17 IST

झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठीवर सत्यवान सावित्री ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा टीझर ही आऊट झाला आहे. 

नवी मालिका येणार म्हटलं की तीची वेळ काय असेल, कोणत्या मालिकेच्या जागी ही मालिका येईल अर्थात कोणती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असे एक ना अनेक प्रश्न पडतात.

लोकमतच्या माहितीनुसार मन झालं बाजींदा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 10 जूनला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. आतापर्यंत राय आणि कृष्णाच्या आयुष्यात गुली मावशी अंतरा आणि ऋतिक वारंवार त्यांच्या संसारात विष पेरायचं काम करत आहेत. मात्र, विधातेंच्या कुटुंबावर वारंवार संकंट गुली मावशीमुळे येत असल्याचं सत्य आता समोर येणार आहे. इतकंच नाही तर तिला विधातेंच्या घरातून हकलून दिलं जाणार आहे. मालिकेचा शेवट राया आणि कृष्णाच्या सुखी संसाराने होणार आहे.  

टॅग्स :झी मराठी