Join us
Daily Top 2Weekly Top 5

Confirm:दिव्यांका त्रिपाठी सोडणार 'ये है मोहब्बते'मालिका,लवकरच चाहत्यांना देणार गुड न्युज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 14:23 IST

छेट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर ...

छेट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ये हैं मोहब्बते ही मालिका. छोट्या पडद्यावरील या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. त्यापैकी रसिकांची लाडकी म्हणजे इशी माँ. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने ही भूमिका साकारली आहे. दिव्यांकाची ही भूमिका रसिकांना फारच भावली. घराघरात इशी माँ म्हणूनच तिची ओळख बनली. मात्र इशी माँ म्हणजेच दिव्यांकाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. कारण रसिकांची लाडकी इशी माँ म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी हिची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. मालिकेत इशी माँ म्हणजेच दिव्यांकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवलं जाणार आहे. हे सगळं मालिकेच्या कथानकाचा भाग असल्याचे दाखवलं जात असलं तरी दिव्यांकाच्या एक्झिटमागे वेगळेच कारण असल्याचे समोर येत आहे. यामागे कोणता वाद कारणीभूत आहे असा तुम्ही विचार करत असाल तर तोही चुकीचा आहे.कारण दिव्यांकाच्या एक्झिटमागे एक गोड कारण असल्याचे समोर येत आहे.तिच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण दिव्यांका लवकरच आई बनणार आहे.ती प्रेग्नंन्ट असल्याची माहिती मिळत आहे.तिच्या 'ये है मोहब्बते' मालिकेतील एक्झिटमागे हेच गोड कारण आहे.सध्या 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगुरी भाभी  म्हणजचे शुभांगी अत्रे मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.मात्र ती हा शो सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र दिव्यांकाची मालिकेतून एक्झिट होत असल्याने तिच्या फॅन्सचा हिरमोड होणार आहे. दिव्यांका आणि विवेकची भेट ये है मोहब्बतेच्या सेटवरच झाली होती.या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री होती त्यामुळे दिव्यांका आणि विवेकने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.गेल्यावर्षी 8 जुलैला दिव्यांका विवेक दाहियासह रेशीमगाठीत अडकली होती.पारंपरिक हिंदू रितीरिवाजाने हे लग्न पार पडले होते. दिव्यांका आणि विवेकची भेट ये है मोहब्बतेच्या सेटवरच झाली होती.या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.