Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्मफलदाता शनी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:34 IST

कर्मफलदाता शनी या मालिकेत जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली होती. जुहीने या मालिकेत संग्या आणि छाया अशा दोन ...

कर्मफलदाता शनी या मालिकेत जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली होती. जुहीने या मालिकेत संग्या आणि छाया अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत जुहीसोबतच सलील अंकोला देखील मुख्य भूमिकेत होता. त्याने या मालिकेत शनिदेवाची भूमिका साकारली होती. यासोबतच या मालिकेत कार्तिकेय मालवीय, सचिन यादव, रोहित खुराणा, सुधा चंद्रन, निर्भय वाधवा यांच्या देखील मुख्य भूमिका होत्या. कर्मफलदाता शनी या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. पण ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण काहीच दिवसांत होणार आहे. या मालिकेच्या ऐवजी जेनिफर विंगेटची बेपनाह ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कर्मफलदाता शनी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या मालिकेत जुही परमारचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण लवकरच होणार आहे. या मालिकेविषयी जुही सांगते, शनी या आमच्या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. आजवर कोणत्याच मालिकेद्वारे प्रेक्षकांना शनी देवाविषयी जाणून घेता आले नव्हते. आमच्या या मालिकेद्वारे शनी देवताविषयी खूप चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आणि ती माहिती प्रेक्षकांना खूप आवडली देखील होती. आजवर शनी देवताला लोक घाबरत होते. पण या मालिकेद्वारे शनी देव एक नायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आला. शनी या देवताची चांगली बाजू या मालिकेत मांडण्यात आली होती. शनी ही मालिका उगाचच न ताणता ती ठरावीक भागांमध्ये संपवण्यात आली असल्याने प्रेक्षकांना ही मालिका अधिक आवडली असे मला वाटते. मी आजवर सकारात्मक भूमिकाच साकारल्या आहेत. पण एक वेगळी जुही प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळाली. प्रेक्षकांना मी साकारलेली नकारात्मक भूमिका देखील आवडली. विशेष म्हणजे माझ्या दोन्ही भूमिकांची रंगभूषा, वेशभूषा सारखी असली तरी मी माझ्या अभिनयातून या दोन्ही भूमिकांमध्ये फरक दाखवला आणि तो प्रेक्षकांना भावला.  

Also Read : छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध जोडप्याने दाखल केला घटस्फोटचा अर्ज