Join us  

कॉमेडी किंग कपिल शर्माला ओळखणे कठीण, सोशल मीडियात फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 2:03 PM

कपिल शर्माची लोकप्रियता अफाट आहे. पण त्याचा नुकताच समोर आलेला फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार ही की हा कपिल शर्मा आहे.

मुंबई : कॉमेडी किंग म्हणून लोकप्रिय असलेला कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही महिन्यांपासून कुठेच दिसत नाहीये. त्याचा पुन्हा सुरु झालेला शो काही दिवसातच बंद करण्यात आला. कपिल शर्माची लोकप्रियता अफाट आहे. पण त्याचा नुकताच समोर आलेला फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार ही की हा कपिल शर्मा आहे.

गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माचा एका फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. असे सांगितले जात आहे की, कपिल शर्माचा हा फोटो भारतातील नसून अॅमस्टरडॅमच्या एका मॉलमधील आहे. 

या फोटोत कपिल शर्मा फार जास्त जाड झाल्याचं बघायला मिळत आहे. कपिलचा हा फोटो पाहून त्याच्या फॅन्सना नक्कीच धक्का बसेल. कारण याआधी कधीही कपिल अशा लूकमध्ये दिसला नाही. कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असून त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहे. नुकताच तो परदेशातून परतला आहे. 

टॅग्स :कपिल शर्मा बॉलिवूडटेलिव्हिजनसेलिब्रिटी