Bharti Singh Second Pregnancy: आपल्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी 'लाफ्टर क्वीन' भारती सिंग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. भारती सिंगसोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तसेच भारती तिचे डेली व्लॉग सुद्धा शेअर करत असते.अशातच नुकतीच भारतीने एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लाफ्टर क्वीन भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार आहे.
भारतीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हर्ष लिंबाचियासोबतचा खास फोटो पोस्ट करून ही गुडन्यूज दिली."आम्ही पुन्हा एकदा प्रेग्नंट आहोत", असं हटके कॅप्शन या पोस्टला देत तिने ही पोस्ट शेअर केली. या फोटोमध्ये, हे जोडपं डोंगरांमध्ये पोज देताना दिसत आहे, तर भारती बेबी बंप फ्लॉन्ट करताना आहे. लवकरच त्यांच्या आयुष्यात एका नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या या जोडप्यावर मनोरंजन विश्वातून तसेच त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.त्यांच्या मुलाचं नाव लक्ष्य आहे, पण त्याला सगळेच लाडाने गोला म्हणून हाक मारतात. भारतीचा मुलगा गोला लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. आता लग्नाच्या आठ वर्षानंतर भारती दुसऱ्यांदा मातृत्व अनुभवणार आहे. दरम्यान, भारतीने प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज दिल्यानंतर तिचे चाहते फार आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहेत.
भारती सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने २००८ मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. २००९-१० मध्ये कॉमेडी सर्कसमध्येही झळकली. याशिवाय भारतीने पंजाबी चित्रपट 'नूर' तसेच अक्षय कुमारच्या 'खिलाडी ७८६' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
Web Summary : Comedian Bharti Singh is expecting her second child. She shared the news with a photo on Instagram. Bharti and Haarsh Limbachiyaa married in 2017 and welcomed their first child, Laksh, in 2022. Fans are showering the couple with congratulations.
Web Summary : कॉमेडियन भारती सिंह दूसरी बार मां बनने वाली हैं। उन्होंने इंस्टाग्राम पर एक फोटो के साथ यह खबर साझा की। भारती और हर्ष लिंबाचिया ने 2017 में शादी की और 2022 में अपने पहले बच्चे, लक्ष्य का स्वागत किया। फैंस जोड़े को बधाई दे रहे हैं।