Join us

'मन की आवाज़ प्रतिज्ञा'च्या दुसऱ्या सीझनचे काउंटडाउन सुरु, या कलाकाराला मिळाली खतरनाक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 15:53 IST

आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न हा अभिनेता नेहमीच करतो.

छोट्या पडद्याचा अभिनेता चेतन हंसराज 'मन की आवाज प्रतिज्ञा'च्या दुसर्‍या सीझनमध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. टीव्ही शो 'ब्रह्मराक्षस 2' मध्ये लोकांना हादरवून टाकणाऱ्या व्यक्तिरेखेनंतर चेतन नव्या भूमिकेत दिसणार आहे. 

चेतन आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा नेहमीच  करतो.'महाभारत'पासून सुरु झालेला हा प्रवास आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. चेतनच्या म्हणण्यानुसार कोणताही कार्यक्रम करण्यापूर्वी त्याला संपूर्ण कथा समजते, जेणेकरून तो त्या भूमिकेत फिट बसू शकेल. चेतन हंसराजने या कार्यक्रमाची कथा  समजून घेण्यासाठी  पहिल्या सीझनचे काही खास एपिसोड  पाहिले. चेतन म्हणतो, ''मला माझ्या भूमिकेत कुठल्याही प्रकारची उणीव, कसर बाकी ठेवायची नाही. आता संधी मिळाली आहे. त्यामुळे मला 'मन की आवाज प्रतिज्ञा'च्या दुसऱ्या सीझनचा भाग झालाचा आनंद  आहे. आयुष्यात मिळालेली  हि एक दुर्मिळ अशी संधी आहे. एखाद्या व्यक्तिरेखेत सामावून जाणे पुरेसे नाही हे मला माहित आहे. व्यक्तिरेखा पूर्णपणे समजलेली असेल तरच ती मला पूर्ण क्षमतेने साकारता येईल. त्यामुळे छोटासा गृहपाठ केल्यास त्यातून चांगलेच निष्पन्न होणार.''

 या शोची कथा  प्रतिज्ञा आणि तिची परिस्थिती कशीही असली तरी न्याय आणि सत्याचा शोध यांचा आहे. तिची प्रामाणिकता आणि खंबीरपणे उभे राहण्याचा तिचा  निर्धार यामुळे महिलांसाठी ती आदर्शवत ठरणार.पूजा गौरबरोबर या सीझनमध्ये अरहान बहल, अवंतिका हुंडल, अंकित गेरा, सोनी सिंग या कलाकारांचा सहभाग असणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजन