पती रोनित विश्वास याच्यासोबत कविता सध्या सुट्या एन्जॉय करीत आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे ती पतीसोबत सुट्या सेलिब्रेट करीत आहे. तिच्या या व्हेकेशनचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये कविताचा अंदाज खूपच बोल्ड दिसत आहे. वास्तविक हा व्हिडीओ कवितानेच तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये कविता बिकिनीमध्ये समुद्रात आपल्या अदा दाखविताना दिसत आहे. कविताने हा व्हिडीओ पोस्ट करताच काही वेळातच त्यास हजारोंच्या संख्येने लाइक्स आणि कॉमेण्ट्स मिळाल्या. कविताचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावल्याचे दिसून येत आहे, तर तिचे काही चाहते तिचा हा हॉट अंदाज बघून आश्चर्यचकित झाले आहेत. कारण नेहमीच रफ अॅण्ड टफमध्ये दिसणारी कविता चक्क हॉट अंदाजात बघावयास मिळत असल्याने चाहत्यांचाही संभ्रम झाल्याचे दिसून येत आहे.