Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनीत भोंडेने खरेदी केली नवी कार, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केला आनंद

By सुवर्णा जैन | Updated: September 28, 2020 13:24 IST

कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे  'चला हवा येऊ द्या' शोमध्ये विनीत भोंडे लोकप्रिय ठरला. या शोमुळे विनितने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय. रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे विनीत भोंडे.कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे  'चला हवा येऊ द्या' शोमध्ये विनीत भोंडे लोकप्रिय ठरला. या शोमुळे विनितने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला. त्याच्या मेहनतीमुळेच  विनीत आज सेलिब्रेटी बनला आहे. 

 

विनती सोशल मीडियावर बराच एक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. नुकतंच विनीतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्याने नवीन कार खरेदी केली आहे. नवीन कारसह त्याने फोटो शेअर केले आहेत. फोटोला त्याने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. त्याचे हे फोटो पाहून चाहत्यांनाही आनंद झाला. लाईक्स आणि कमेंटस देत त्याच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

दोन वर्षापूर्वीच सोलापूरच्या सोनम पवार हिच्यासोबत विनित भोंडचा लग्नबंधनात अडकला.सोनम पवार आणि विनित भोंडे यांचे हे अरेंज मॅरेज आहे. कुटूंबियांनी विनित भोंडेंसाठी ही मुलगी पसंत केली. विनित आणि सोनमने एकमेकांना पसंती दिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आयुष्याची नवीन सुरूवात करत प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना तो दिसतो.

'बिग बॉस मराठी' शोमध्ये तो झळकला हा शोही त्याने आपल्या अदाकारीने तुफान गाजवला. हा शो सुरूवातीपासूनच विनीतमुळे जास्त चर्चेत राहिला. यावेळी रिअल विनित भोंडे पहिल्यांदा चाहत्यांनी पाहिला. त्याचा प्रत्येक अंदाज चाहत्यांनी पसंत केला. 'चला हवा येऊ द्या' आणि  मराठी बिग बॉस शोव्यतिरिक्त सिनेमातही त्याने आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. 'शहाणपण देगा देवा', 'पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा' यासारखे सिनेमातही काम केले आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्या