Join us

श्रेया बुगडेच्या गळ्यात ‘बिग बॉस’चा ‘डोळा’; ‘कॉमेडी क्वीन’च्या हटके लॉकेटची चर्चा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 08:00 IST

Shreya Bugde : काही दिवसांपूर्वी श्रेया बुगडेनं घातलेल्या जोडव्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. आता काय तर श्रेयाच्या लॉकेटनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली श्रेया बुगडे (Shreya Bugde) आपल्या डिसेंट लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.  काही दिवसांपूर्वी तिच्या एअरपोर्ट लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. विशेषत: तिच्या पायातील जोडवी. होय, तिनं घातलेल्या जोडव्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. आता काय तर श्रेयाच्या लॉकेटनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. होय, श्रेयाच्या गळ्यात चक्क ‘बिग बॉस’चं लॉकेट आहे.आता ‘बिग बॉस’चं लॉकेट म्हणजे काय तर बिग बॉसच्या लोगोसारखं दिसणारं लॉकेट. होय, हे हटके लॉकेट घालून श्रेयाने एकापेक्षा एक जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.विशेष म्हणजे, श्रेयाच्या या लॉकेटने काही चाहत्यांना जरा कन्फ्युजही केलं आहे. होय, हे लॉकेट पाहून श्रेया बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री करणार का? असा प्रश्न पडला आहे.

 

चाहत्यांनी दिल्या धम्माल कमेंट्सश्रेयाच्या गळ्यातील हटके लॉकेट पाहून चाहत्यांनी धम्माल कमेंट्स केल्या आहेत. बिग बॉसचा डोळा सारं बघतुया, अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे. अजून किती विकेट पाडशील लोकांच्या, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. काहींनी श्रेयाच्या गळ्यातील हे लॉकेट म्हणजे, तिसरा डोळा असल्याचं म्हटलं आहे. एकंदर काय तर श्रेयाच्या या बिग बॉस लॉकेटची जोरदार चर्चा आहे.महिला कॉमेडीयन म्हणून श्रेयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच श्रेया बुगडेबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात. सोशल मीडियावरही श्रेयाची बरीच चर्चा असते. तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात. 

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्याबिग बॉस मराठी