Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या भाऊ कदम चला हवा येऊ द्यामध्ये का विसरतो त्याचे संवाद, पाहा हा मजेशीर व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 17:02 IST

भाऊ आपली स्क्रिप्ट कशाप्रकारे पाठ करतो याचा मजेशीर व्हिडिओ कुशल बद्रिकेने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला असून हा चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देहा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ एका दिवसांत एक लाख 27 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करतो. या कार्यक्रमातील भाऊ कदम तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. भाऊ त्याच्या विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतो. पण हाच भाऊ अनेकवेळा त्याचे संवाद विसरतो अशी त्याची टर चला हवा येऊ द्यातील इतक कलाकार घेताना आपण अनेकवेळा दिसतात. एवढेच नाही तर मी स्क्रिप्ट विसरलो किंवा स्क्रिप्ट पाठांतर नाही असे देखील भाऊ अनेकवेळा कार्यक्रमात विनोदी शैलीने बोलताना दिसतो.

भाऊ आपली स्क्रिप्ट कशाप्रकारे पाठ करतो याचा मजेशीर व्हिडिओ कुशल बद्रिकेने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला असून हा चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भाऊ स्क्रिप्ट वाचत असताना झोपी गेलेला आपल्याला दिसतोय. त्यावर तू आरामात झोपत का नाहीस असे कुशल त्याला विचारताना दिसत आहे. मी झोपत नाहीये.... तर पाठांतर करतोय असे सांगत भाऊ परत झोपताना दिसतोय...

कुशलने हा व्हिडिओ शेअर करताना  भाऊ कदम यांचं पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा... असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ एका दिवसांत एक लाख 27 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर भाऊचे चाहते मजेशीर कमेंट देत आहेत. 

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या