'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेला कार्यक्रम. कित्येक वर्ष मनोरंजन केल्यानंतर या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचाने अनेक नवोदित कलाकारांनाही टॅलेंट दाखवण्याची संधी दिली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री स्नेहल शिदम. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या स्नेहलने तिच्या अभिनयाने आणि विनोद कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. अल्पावधीतच स्नेहलने तिचा स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला.
स्नेहल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत स्नेहलने गणपतीपुळे गाठलं आहे. कोकणातील गणपतीपुळे या देवस्थानाला स्नेहलने भेट दिली. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पाच्या चरणी स्नेहल नतमस्तक झाली.
दरम्यान, स्नेहलच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने काही मालिका आणि सिनेमांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'चला हवा येऊ द्या' नंतर 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कॉमेडी शोमधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. 'आदिशक्ती' या मालिकेत ती दिसली होती. 'स्वीटी सातारकर', 'बांबू', 'बॉइज ३' या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.