Join us

"नियती फार क्रूर असते.."; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात करतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:25 IST

'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व सुरु झालंय. अशातच कुशल बद्रिकेने केलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता कुशल बद्रिके हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. कुशलला आपण विविध मालिका, सिनेमांंमधून अभिनय करताना पाहिलंय. गेल्या काही वर्षात कुशल हिंदी रिअॅलिटी शो 'मॅडनेस मचाएंगे' मध्ये गौरव मोरे, हेमांगी कवी यांच्यासोबत दिसला. कुशल सोशल मीडियावर सक्रीय असतो. कुशल त्याच्या मनातील भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतो. अशातच कुशलने लिहिलेल्या नव्या पोस्टमुळे चाहत्यांच्या मनात मात्र चिंता लागून राहिली आहे.

कुशलची नवीन पोस्ट

कुशल बद्रिकेने सूर्यास्त बघत असलेला एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली कुशलने लिहिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. कुशल लिहितो की, "श्री कृष्णाच्या करंगळीचा घाव भरायला द्रौपदी धावली. पण अश्वत्थाम्याची जखम मात्र कायम भळभळती राहिली, चिरकाल. नियती फार क्रूर असते, जखमा भरून यायला सुद्धा जन्म “कृष्णाचा” यावा लागतो.", अशाप्रकारे कुशलच्या नवीन पोस्टमुळे सर्वांना चिंता लागून राहिली आहे.  कुशल नेमकं कोणाला उद्देशून म्हणाला? त्याच्या आयुष्यात सर्व ठीक आहे ना? असे प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले आहेत.

कुशल झळकतोय चला हवा येऊ द्यामध्ये

'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शनिवारी(२६ जुलै) 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचा पहिला भाग प्रसारित झाला. पुन्हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम भेटीला आल्याने या पर्वासाठी चाहतेही उत्सुक होते. या नवीन पर्वात 'चला हवा येऊ द्या'मधले काही जुने चेहरे नाहीत. या चेहऱ्यांना प्रेक्षक मिस करत आहेत. 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात कुशल बद्रिकेसह, गौरव मोरे, श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव झळकत आहेत. याशिवाय अभिजीत खांडकेकर या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन करत आहे.

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्याश्रेया बुगडे