Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटींचाही कृष्णाच्या शोला ठेंगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 14:03 IST

आधी हृतिक रोशन नंतर खिलाडी अक्षय कुमार आणि आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या कॉमेडी नाईट्स बचाओ शोमध्ये ...

आधी हृतिक रोशन नंतर खिलाडी अक्षय कुमार आणि आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या कॉमेडी नाईट्स बचाओ शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिलाय.. हाऊसफुल्ल-3 सिनेमाच्या कृष्णाच्या या कॉमेडी शोमध्ये आलेल्या अनुभवामुळं जॅकलिननं या शोमध्ये येण्यास नकार दिलाय.कॉमेडी नाईट्स बचावच्या टीमनं जॅकलिन आणि तिची हाऊसफुल्ल-3 सिनेमामधील कोस्टार लिसा हेडनबाबत काही शेरबाजी केली होती.. त्यामुळं जॅकलिन या शोवर नाराज आहे. त्यामुळं आगामी ढिश्शूम सिनेमाच्या प्रमोशनसाठी कॉमेडी नाईट्स बचाओच्या सेटवर न जाण्याचा निर्णय जॅकलिन आणि वरुण धवननं घेतलाय..