Join us
Daily Top 2Weekly Top 5

या सेलिब्रेटींनी द कपिल शर्मा शो पासून दूर राहाणेच केले आहे पसंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 13:12 IST

द कपिल शर्मा शोमध्ये येण्याची इच्छा अनेक कलाकारांची, क्रिकेटरची असते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलने आमंत्रण देऊन देखील काही कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमाला आजवर हजेरी लावलेली नाही.

ठळक मुद्देकपिल सचिनचा खूप मोठा फॅन असून त्याने सचिनला या कार्यक्रमात येण्यासाठी अनेकवेळा विचारले देखील आहे. 

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. कपिल शर्मा सोबतच कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किकू शारदा, अर्चना पुरणसिंग यांसारखे कलाकार या शो चा भाग आहेत. द कपिल शर्मा शो मध्ये प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिवूडमधील अनेकजण या कार्यक्रमात आजवर येऊन गेले आहेत. आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी तर प्रत्येक कलाकारांची पहिली पसंत ही द कपिल शर्मा शो हीच असते. 

द कपिल शर्मा शोमध्ये येण्याची इच्छा अनेक कलाकारांची, क्रिकेटरची असते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलने आमंत्रण देऊन देखील काही कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमाला आजवर हजेरी लावलेली नाही. कपिलच्या शो मध्ये आजवर अनेकवेळा शाहरुख खान आणि सलमान खान यांना आपल्याला पाहायला मिळाले आहे. सलमान तर आता या कार्यक्रमाचा निर्माता देखील आहे. पण खानांच्या तिकडीतील आमिर खान कधीच द कपिल शर्मा शो मध्ये आजवर आलेला नाही. अनेक कलाकार आपल्या चित्रपटांचे मालिका अथवा कार्यक्रमाद्वारे प्रमोशन करत असतात. पण यासाठी आमिर खान हा अपवाद ठरतो. आमिर खानला कोणत्या कार्यक्रमात जाऊन त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करायला आवडत नाही आणि त्याचमुळे तो आजवर कधीच या कार्यक्रमात झळकला नाही.

 क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू अनेक वर्षांपासून द कपिल शर्मा शोचा भाग होते. आता त्यांची जागा अर्चना पुरणसिंगने घेतली आहे. नवज्योत सिंग सिद्धू असताना अनेक क्रिकेटर्सने या कार्यक्रमात येऊन कपिल आणि टीमसोबत धमाल मस्ती केली आहे. या कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी 1983 च्या विश्वविजेत्या टीमला देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या कार्यक्रमापासून दूरच राहिला आहे. कपिल सचिनचा खूप मोठा फॅन असून त्याने सचिनला या कार्यक्रमात येण्यासाठी अनेकवेळा विचारले देखील आहे. 

कपिल शर्मा शो मध्ये संजय दत्त कधीच दिसला नाही. द कपिल शर्मा शो सुरू झाल्यापासून संजय दत्तचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण तरीही त्याने या कार्यक्रमात आजवर हजेरी लावलेली नाही.  

टॅग्स :द कपिल शर्मा शोसचिन तेंडुलकरआमिर खानसंजय दत्त