Join us  

​गोठच्या सेटवर झाले महिला दिनाचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 11:42 AM

स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेच्या सेटवर नेहमीच सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या मालिकेतल्या अभिनेत्रींना नुकतेच महिला ...

स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेच्या सेटवर नेहमीच सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या मालिकेतल्या अभिनेत्रींना नुकतेच महिला दिनाचे खूप छान सरप्राईज मिळाले. या मालिकेतील पुरुष सहकलाकारांनी आपल्या स्त्री सहकलाकारांसाठी खूप छान गिफ्ट आणले होते. हे गिफ्ट्स देऊन सेटवर महिला दिन साजरा करण्यात आला.गोठ मालिकेतील अभय म्हापसेकर, अर्थात सुशील इनामदार आणि बरूण मौर्य यांनी सुप्रिया विनोद (कांचन), क्षमा देशपांडे (बायोआजी), रुपल नंद (राधा), सुरभी भावे (दीप्ती), शलाका पवार (सुलेखा) या सहअभिनेत्रींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सोबतच गुलाब आणि चॉकलेट्सही दिली. या सरप्राईजने या सर्व जणी खूप खूश झाल्या होत्या. महिला दिनाच्या या सेलिब्रेशनविषयी सुप्रिया विनोद यांनी आवर्जून फेसबुकवर पोस्टही लिहिली. त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, आमच्या 'गोठ'च्या सेटवर सगळे सणवार नेहमीच उत्सवात साजरे होतात. अगदी एरवी घरी कधी केले नसतील इतके साग्रसंगीतपणे सगळेच सण आम्ही मालिकेच्या सेटवर साजरे करतो. काल म्हणजेच वुमन्स डेला आमच्या व्यक्तिरेखेचे नाही तर माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून आमच्या मालिकेच्या टीममधील मंडळींनी आमचे कौतुक केले. आम्हाला कोणालाच याची कल्पना नव्हती. अचानक मिळाेल्या या सरप्राईजमुळे आम्ही सगळेच खूश झालो. सुशीलने मला लाल गुलाब दिले, वरुणने चॉकलेट्स दिली. सगळीकडे 'हॅपी वुमन्स डे 'लिहिलेले होते. स्त्री म्हणून आजवर मला काय मिळाले, काय नाही या खोलात मी शिरले नाही...पण काल खूपच मजा आली असे मी नक्कीच सांगेन. गोठ या मालिकेच्या सेटवर नेहमीच काही ना काही धमाल मस्ती सुरू असते. काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवर आइस्क्रीम पार्टी झाली होती. या मालिकेच्या टीममधील कलाकारांनी मालिकेच्या सेटवर मनसोक्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला होता. रुपल नंद, नीलकांती पाटेकर, सुप्रिया विनोद, समीर परांजपे या सगळ्याच कलाकारांनी आइस्क्रीमवर ताव मारला होता. तसेच ख्रिसमसमध्ये नीलकांती पाटेकर यांनी सिक्रेट सॅन्टा बनून सगळ्यांना गिफ्टदेखील दिले होते. Also Read : ​स्टार प्रवाहच्या गोठमध्ये बयो आजी आणि बेबी आत्या आमने सामने