Join us

Casting Couch : ‘काम हवं असेल तर कॉम्प्रोमाइज करावं लागेल’ एजंटची ‘या’ अभिनेत्रीला आॅफर !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 17:00 IST

छोट्या पडद्यावरून प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्रीला एका एजंटने कामासाठी कॉम्प्रोइज करावे लागेल अशा प्रकारची आॅफर दिली, वाचा सविस्तर!

टीव्ही अभिनेत्री सुलगना चॅटर्जी हिने कास्टिंग काउचविरोधात एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. सुलगनाने खुलासा केला की, बॉलिवूडमधील टॉप लोकांकडून एक अतिशय घाणेरडी आॅफर मिळाली होती. ज्यामध्ये त्यांनी कॉम्प्रोमाइज करण्यास सांगितले होते. याविषयी सुलगनाने एका एजंटसोबत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चॅटिंगही केले होते. याच चॅटिंगचा एक स्क्रीनशॉट सोशल अकाउंटवर शेअर करताना तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. सुलगनाच्या या खुलाशानंतर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सुलगनाने ‘सौभाग्यवती भव:’, संस्कार-धरोहर अपनों की, महादेव और मिसेज प्यारेलाल’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले. दरम्यान, या अगोदरही कास्टिंग काउचविषयी अभिनेत्री विद्या बालन, राधिका आपटे यांनी अतिशय बिंधास्तपणे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, सुलगनाने तिच्या फेसबुक अकाउंटवर चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट करून झालेल्या संवादाचा उलगडा केला. या चॅटमधून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, एजंट दिग्दर्शकांच्या माध्यमातून संवाद साधत आहे. तो सुलगनालला कॉम्प्रोमाइज करण्याविषयी सांगत आहे. त्यावर उत्तर देताना सुलगना लिहिते की, ‘जेव्हा अशा प्रकारच्या आॅफर सर्वसामान्य होतात, तेव्हा तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.’ दरम्यान, सुलगनाला जेव्हा याविषयी संपर्क करण्यात आला तेव्हा तिने सांगितले की, ‘मी ही पोस्ट सहज शेअर केली. मी याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी मिळवू इच्छित नाही. या प्रकरणाविषयी सांगायचे झाल्यास, मी कामासाठी त्या व्यक्तीसोबत माझा नंबर एक्सचेंज केला होता. मात्र आता मला तो नंबर आठवत नाही. त्याने अचानकपणे मला मॅसेज पाठविला. ज्यामध्ये एका जाहिरातीची आॅफर देण्यात आली होती. ही जाहिरात बॉलिवूडमधील एका ‘ए’ लिस्ट अभिनेत्याबरोबर करायची होती. त्यावेळी मी खूप आनंदी होते. त्यानंतर एजंटने मला सांगितले की, शूटिंग एका दिवसाची असेल. मी विचार करीत होते की, तो मला लूक टेस्टकरिता बोलावणार. परंतु त्याने अचानकच मला कॉम्प्रोमाइज करण्याबाबतचा मॅसेज पाठविला. इतर तो मला काय बोलला हे स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. तो सातत्याने विचारत होता की, कधी तू कॉम्प्रोमाइज प्रोजेक्ट्स केले आहेत काय? तेव्हा मी त्याला म्हटले की, या सर्व गोष्टी मला विचारून काहीही फायदा होणार नाही.’सुलगनाने पुढे बोलताना सांगितले की, ‘मला ‘ए’ लिस्टवाल्यांकडून अशा प्रकारची आॅफर कधीही मिळाली नव्हती. अशा प्रकारच्या आॅफर्स दलालांच्या मार्फत येत असतात. मला अद्यापपर्यंत एकाही दिग्दर्शक अथवा निर्मात्यांनी म्हटले नाही की, कॉम्प्रोमाइज केल्यास तर तू खूप  सुपरस्टार बनशील. दरम्यान, सुलगना या प्रकारामुळे चांगलीच हादरून गेली असून, अशा प्रकारचे संदेश पाठविणारे धाडस कसे करतात या विचाराने ती हैराण झाली आहे.