Join us
Daily Top 2Weekly Top 5

​'लेक माझी लाडकी' मधील साकेत आणि मीरा यांच्या नात्याला नाव मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 17:13 IST

‘एक मुलगा आणि एक मुलगी हे केवळ चांगले मित्र असूच शकत नाही,’ हा संवाद मैने प्यार किया चित्रपटात मोहनीश ...

‘एक मुलगा आणि एक मुलगी हे केवळ चांगले मित्र असूच शकत नाही,’ हा संवाद मैने प्यार किया चित्रपटात मोहनीश बहलच्या तोंडी होता. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी आजही हा संवाद चांगलाच ताजा वाटतो. या संवादाप्रमाणेच काहीसे सध्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून साकेत आणि मीरा एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यामुळे आता साकेत मीराला प्रपोज करणार का? साकेत आणि मीरा यांच्याल्या नात्याला नाव मिळणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.'लेक माझी लाडकी' या मालिकेचे कथानक आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. मीरा आणि साकेत लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. मैत्रीच्याही पलीकडचे असे त्यांचे नातं आहे. पण या नात्याला काहीही नाव नाही. साकेतच्या मनात मीराविषयी तसा काही विचार देखील नाही. मीरासाठी कसा नवरा हवा, हे आदित्यने विचारल्यावर साकेत जे वर्णन सांगतो ते त्याचेच आहे. पण याची आजही जाणीव त्याला झालेली नाही. आता मीरासाठी स्थळे शोधली जात आहेत. त्यात मीराच्या आयुष्यात डॉ. ऋषिकेशचा प्रवेश होणार आहे. या सगळ्याने साकेतच्या मनात चलबिचल वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून साकेत मीराला प्रपोज करणार का, तिच्याशी लग्नाची तयारी दर्शवणार का आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या नात्याला नाव मिळणार का, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.या मालिकेत मीराची भूमिका सायली देवधर साकरत असून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद तिच्या भूमिकेला मिळत आहे.