Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी 2 - घरामध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क - कोण होणार सेफ ? कोण नॉमिनेशन मध्ये जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:14 IST

घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये समोरच्या स्पर्धकाचे तिकीट मिळवून सेफ होण्याचा प्रयत्न करायचा आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक मिनिटाला नाती बदलताना दिसत आहेत.त्यामुळे मिनीटा मिनीटाला कितने अजीब रिश्ते है यहाँ पे याची प्रतिची आल्या शिवाय राहात नाही.  कोण कधी कोणाच्या विरोधात बोलेल आणि कधी बाजूने याचा नेम नाही. कोण कोणाच्या ग्रुपमध्ये जाईल हे सुध्दा सांगता येणे कठिणच.घरातील स्पर्धकांमध्ये  एकमेकाबद्दल बरेच गैरसमज आहेत, त्यामुळे सदस्यांना कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हेच कळत नाहीये. वीणाने काल रुपालीसोबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि रुपालीने देखील तिला सांगितले तू कशीही वागलीस तरी देखील मी तुझ्या पाठीशी उभी असेन. त्यामध्ये काल किशोरी शहाणे यांना वीणाने स्पष्ट सांगितले कि, मी कोणाच्या ग्रुपमध्ये नाही मी वैयक्तिक खेळत आहे . तर, रुपालीने किशोरीताईना आधार दिला आणि सांगितले जस आपण परागच्या वेळेस केले तसेच यावेळेस देखील वीणाला सांगू आणि पुढे जाऊ. याचसोबत घरामध्ये काल अभिजीत आणि रुपाली मध्ये कॅप्टनसी टास्क रंगला.

घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे . ज्यामध्ये  समोरच्या स्पर्धकाचे तिकीट मिळवून सेफ होण्याचा प्रयत्न करायचा आहे. या टास्कदरम्यान नेहाने वीणाला सांगितले आपल्या दोघींमध्ये कोणी एक सेफ होऊ शकत त्यावर वीणाने सांगितले तू मला दे तिकीट आणि सेफ कर त्यावर नेहाचे म्हणणे पडले या आठवड्यात मला रिस्क आहे त्यामुळे मला दिलेस बर होईल. त्यावर वीणाने सांगितले, मला नाही मिळत आहे, तुलासुध्दा नाही मिळणार. दोघेही नॉमिनेशनमध्ये जाऊ”.  आता सदस्य समोरच्या सदस्याला तिकीट देऊन सेफ होण्याची संधी देतील ? कोण कोण नॉमिनेशनमध्ये जाईल ? कोण सेफ होईल हे बघणे रंजक असणार आहे.

टॅग्स :बिग बॉस