Join us  

Bigg boss: बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच 'या' स्पर्धकाला आला पॅनिक अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:10 AM

या शोमध्ये सहभागी होणाऱ्या एका स्पर्धकाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शोमधील एका स्पर्धकाला घरात प्रवेश करण्यापूर्वीच पॅनिक अटॅक आल्याचं सांगण्यात येतं.

ठळक मुद्देलवकरच बिग बॉस १५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. या शोचं प्रत्येक पर्व तुफान गाजत असतं. घरात सतत रंगणारे वाद, प्रेमप्रकरणं यामुळे हा शो कायम चर्चेत असतो. त्यातच आता 'बिग बॉसचं १५' वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या शोची चर्चा रंगली आहे. त्यातच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या एका स्पर्धकाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शोमधील एका स्पर्धकाला घरात प्रवेश करण्यापूर्वीच पॅनिक अटॅक आल्याचं सांगण्यात येतं.

'स्पॉट बॉय'नुसार, लवकरच बिग बॉस १५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वीच या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक चर्चेत आले आहेत. यामध्येच अफसाना खान (Afsana Khan) चर्चेत आली आहे. अफसाना बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच तिला पॅनिक अटॅक आला. सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बॉसच्या हाऊसमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी तिला पॅनिक अटॅक आला. ज्यामुळे तिला शोमधून बाहेर पडावं लागलं. अफसाना सध्या तिच्या घरी पंजाबला गेली आहे.

अभिनेता कुणाल कपूर आहे बिग बींचा जावई; बच्चन कुटुंबातील 'या' मुलीशी केलंय त्याने लग्न

'बिग बॉसम'ध्ये सहभागी होण्यापूर्वी अफसाना एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाली होती. त्याचवेळी तिला पॅनिक अटॅक आला. याविषयी तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

"सध्या माझी प्रकृती बरी नाही. अजुनही मी आजारीच आहे. बीबीच्या १५ व्या सीजनची नावं फायनल झाली आहेत. त्याच दरम्यान झालेल्या सगळ्या प्रकारामुळे मी गोंधळून गेले", असं अफसाना म्हणाली.

हे आहेत 'बिग बॉस १५'चे स्पर्धक

अफसाना खान,तेजस्वी प्रकाश, करण चंद्रा, सिंबा नागरपाल, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल भ्रिष्ट आणि उमर रियाज यांची नावे घोषित करण्यात आली होती.  

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटिव्ही कलाकार