Join us

किसबाई किस! Bigg boss OTT मधला किसचा किस्सा संपेना; मनीषा राणीने अब्दुसोबत केलेलं कृत्य चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2023 18:13 IST

Bigg boss OTT

प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT). नुकतंच या शोचं दुसरं पर्व सुरु झालं आहे. विशेष म्हणजे यंदाचं हे पर्व सुरु झाल्यापासून सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धकांमधील जोरदार भांडणाने झाली. मात्र, आता या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच या घरात  अभिनेता जैद हदीद आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी यांनी लीपलॉक केलं होतं. त्यानंतर आता मनीषा राणीने जबरदस्ती अब्दू रोजिकला (abdu rozik) किस करायचा प्रयत्न केला आहे.

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटीच्या घरातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू गाणं म्हणत आहे. तर, मनीषा राणी त्याला बळजबरीने किस करायचा प्रयत्न करत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

अलिकडेच अब्दू रोजिक या शोमध्ये पाहुणा कलाकार म्हणून आला होता. यावेळी स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. यात अब्दू घरातून बाहेर जाण्यापूर्वी त्याला बिग बॉसने ४ नॉमिनेटेड स्पर्धकांसह डान्स करायला सांगितला होता. हा टास्क अब्दू पूर्ण करत असताना मनीषा वारंवार त्याला किस करायचा प्रयत्न करत होती. विशेष म्हणजे तिचं हे वागणं पाहून अब्दूदेखील संकोचला होता आणि त्याला विचित्र वाटत होतं.

Bigg boss OTT: अरे देवा! ऑन कॅमेरा स्पर्धकांनी केलं लीपलॉक; व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, मनीषाचं हे वागणं पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. इतंकच नाही तर नेटकऱ्यांनी आता या शोवरही पुन्हा एकदा टीकास्त्र डागलं आहे. साध्याशा फुटेजसाठी मनीषाने किती वाईट काम केलं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, मनीषा चुकीचं वागत होती. मात्र, तरीदेखील अब्दूने त्याची मर्यादा सोडली नाही, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनसेलिब्रिटी