Join us

Bigg Boss Marathi S3: 'उत्कर्ष फक्त बोलबच्चन, त्याच्यात...'; ग्रुपमध्ये विकासने केली गॉसिपिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 14:31 IST

Bigg Boss Marathi S3: सध्या या घरात स्पर्धकांचे तीन वेगवेगळे ग्रुप तयार झाले असून दररोज या ग्रुपमध्ये अन्य स्पर्धकांविषयी गॉसिप होत असतं.

ठळक मुद्दे 'बिग बॉस'च्या घरात तीन ग्रुप पडल्यामुळे दररोज टास्कसोबत वादही रंगत असतात.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसांमध्येच घरात स्पर्धकांचे ग्रुप पडायला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या घरात स्पर्धकांचे तीन वेगवेगळे ग्रुप तयार झाले असून दररोज या ग्रुपमध्ये अन्य स्पर्धकांविषयी गॉसिप होत असतं. त्यातच काल झालेल्या भागात घरात एक टास्क रंगला असून बिग बॉसने दोन नवीन ग्रुप घोषित केले आहेत. या टास्कविषयीच विकास त्याचं मत मांडणार असून तो उत्कर्षवर टीका करताना दिसून येणार आहे.

"दिवसभरात मी उत्कर्षचं जे निरिक्षण केलंय त्याविषयी मला तुम्हाला काही तरी सांगायचं आहे. पहिला टास्कच्या वेळी तो मडकी फोडण्याचा तयारीत होता. पण त्यांच लक्ष destruction वर नाही तर काही तरी क्रिएट करण्यावर आहे. आपली मडकी कशा पद्धतीने वाचतील याचं प्लॅनिंग त्याने केलंच नाही", असं विकास म्हणाला.

हिरोची एण्ट्री! ऊर्मिला निंबाळकरने शेअर केली बाळाची पहिली झलक

पुढे तो म्हणतो, "तो सतत मोठ्या हुश्शारक्या मारतो की, मी असं करेन, तसं करेन. खरं सांगायच ना तर उत्कर्ष “बोलबच्चन” आहे. त्याची मेंटल, Physical capability काही नाहीये”.

दरम्यान, 'बिग बॉस'च्या घरात तीन ग्रुप पडल्यामुळे दररोज टास्कसोबत वादही रंगत असतात. त्यामुळेच आजच्या टास्कमध्ये नेमकं काय होणार ? पुन्हा स्पर्धकांमध्ये वाद रंगणार का हे आजचा भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीटिव्ही कलाकार