Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा आठवडा सुरू आहे. दिवसेंदिवस घरातील समीकरणंही बदलत असल्याचं दिसत आहे. बॉलिवूड गाजवलेला राकेश बापटही यंदा बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाला आहे. राकेशच्या एन्ट्रीने चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी राकेश एक आहे. घरातील दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे यांच्याशी राकेशचे पहिल्या दिवसापासूनच चांगले संबंध आहेत. आता राकेशने या दोघींशी बोलताना बिग बॉसच्या घरात लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. त्याने बायकोबद्दलच्या अपेक्षाही सांगितल्या.
'बिग बॉस मराठी'च्या घरातील राकेशचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता, राकेश आणि दिपाली डायनिंग एरियामध्ये बसल्याचं दिसत आहे. राकेश म्हणतो, "मी कधी लग्न करेन कर एका सिंगरशी करेन. ती रोज रियाज करेल आणि मी ऐकत राहीन. ती सकाळी उठेल साडी नेसून तानपुरा घेऊन बसेल. तिचे केस ओले असतील. आणि ती सुंदर गातेय...जणू सरस्वतीच". राकेशचं बोलणं ऐकून दिपाली आणि प्राजक्ता त्याच्या कल्पना शक्तीला दाद देतात.
दरम्यान, राकेशने बॉलिवूड अभिनेत्री रिद्धी डोग्रा हिच्यासोबत लग्न केलं होतं. २०११ मध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. एका मालिकेच्या सेटवर ते एकमेकांना भेटले होते. मात्र लग्नानंतर ८ वर्षांनी २०१९ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर राकेश शमिता शेट्टीला डेट करत होता. मात्र नंतर त्यांचंही ब्रेकअप झालं.
Web Summary : Raqesh Bapat, currently in Bigg Boss Marathi 6, expressed his desire to marry a singer. He described his ideal wife as someone who practices singing daily, embodying the goddess Saraswati. He was previously married to Ridhi Dogra.
Web Summary : राकेश बापट, जो वर्तमान में बिग बॉस मराठी 6 में हैं, ने एक गायिका से शादी करने की इच्छा व्यक्त की। उन्होंने अपनी आदर्श पत्नी को ऐसी व्यक्ति बताया जो प्रतिदिन गायन का अभ्यास करती है, जो देवी सरस्वती का प्रतीक है। उन्होंने पहले रिद्धि डोगरा से शादी की थी।