Join us  

Video : “पॉलिटिक्स इज काइंड ऑफ वॉर”, अभिजीत बिचुकलेंच्या इंग्रजीने अवधूत गुप्तेची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 3:50 PM

'खुपते तिथे गुप्ते'मध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि राजकारणात सक्रिय असलेले अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा लोकप्रिय शो आहे. या शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर राजकीय नेते, सेलिब्रिटी हजेरी लावतात. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते या शोचं सूत्रसंचालन करत आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींना अवधुत त्याच्या खुमासदार शैलीत प्रश्न विचारून बोलतं करत असतो. या शोच्या नवीन भागाचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यंदाच्या भागात ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि राजकारणात सक्रिय असलेले अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’ मधील अभिजीत बिचुकले अवधूतच्या धारदार प्रश्नांना उत्तरं देताना दिसणार आहेत. या शोमधील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिजीत बिचुकले इंग्रजीत बोलताना दिसत आहेत. “मी असं इंग्रजी बोलतो की ते शब्द डिक्शनरीत कुठे लिहिलेत तेदेखील कळणार नाही,” असं बिचुकले म्हणतात. पुढे ते राजकारणाबद्दल इंग्रजीतून बोलताना दिसत आहेत. “पॉलिटिक्स इज काइंड ऑफ वॉर. स्ट्रगल फॉर एक्झिस्टंट्स (राजकारण हे एक युद्ध आहे. इथे तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो”, असं बिचुकले म्हणत आहेत.

शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी मोडणार सनी पाजीच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड? कमावणार ‘इतके’ कोटी

हिंदी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असतानाच पुन्हा बिबट्या घुसला अन्...; नेमकं काय घडलं?

अभिजीत बिचुकलेंचं इंग्रजी ऐकून अवधूत गुप्तेचीही बोलती बंद झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमधील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून यावर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. बिचुकलेंआधी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, नारायण राणे, अमोल कोल्हे या राजकीय नेत्यांनी खुपते तिथे गुप्तेमध्ये हजेरी लावली होती.

टॅग्स :अभिजीत बिचुकलेटिव्ही कलाकारटेलिव्हिजनबिग बॉस मराठी