Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6 च्या घरात कुणाची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री? दार उघडताच सदस्यांचे चेहरेच उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:18 IST

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील वाईल्ड कार्ड एन्ट्री पाहून स्पर्धकांना बसला धक्का, नॉमिनेशन कार्यात राडा

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शोमध्ये रविवारी भाऊच्या धक्क्यावर एक महत्त्वाचा ट्विस्ट आला. तो म्हणजे,  राधा पाटील घरातून बाहेर आली. तिच्या एलिमिनेशनने घरातील अनेकांना धक्का बसला. राधा पाटील बाहेर पडल्यानंतर आता 'बिग बॉस'च्या घरात वाईल्ड कार्डचा धमाका पाहायला मिळाला आहे.

'बिग बॉस'च्या खेळाचा तिसरा आठवडा सुरू झाला असून सुरुवातीलाच 'बिग बॉस'ने घरात 'निर्मळ दिखावा' या एका अनोख्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचे स्वागत करण्यात आले.  मात्र, हा कोणी प्रत्यक्ष स्पर्धक नव्हता, तर घरातील सदस्यांच्या वागण्यावर ओढलेलं ते एक उपरोधिक ताशेरे होतं. हा 'निर्मळ दिखावा' जसा कोणाला दिसत नव्हता, तसेच घरातील सदस्यदेखील खेळात कुठेच दिसत नसल्याचे बिग बॉसने स्पष्ट केले. "काही सदस्य मिस्टर इंडिया झाले आहेत, ते खेळात कुठेच दिसत नाहीत. फक्त घरची कामं करणं म्हणजे गेम खेळणं नाही" अशा कडक शब्दांत 'बिग बॉस'ने स्पर्धकांना सुनावले आणि त्यांच्या सुस्त पडलेल्या खेळावर निशाणा साधला.

पुढे 'बिग बॉस' नॉमिनेशनसाठी स्पर्धकांना बोलावतात. बिग बॉसच्या घरात न दिसणाऱ्या सदस्यांसाठी Mr. India हे नॉमिनेशन कार्य पार पडतं. नॉमिनेशनच्या पहिल्या फेरीत दीपाली आणि दिव्या समोरासमोर आल्या. त्यांना नॉमिनेट करण्यासाठी सागर आणि ओमकार आले होते. ओमकारने दिव्याची बाजू घेतल्यामुळे सागर आणि दिव्यामध्ये जोरदार वाद झाला. सागर आणि ओमकारचे एकमत न झाल्याने अखेर निर्णय सोनाली आणि आयुषच्या हातात गेला. त्यांनी दिव्याला सेफ करत दीपालीला नॉमिनेट केले.  तर दुसऱ्या फेरीत विशाल आणि अनुश्री आले. त्यांना नॉमिनेट करण्यासाठी तन्वी आणि राकेश आले होते. यावेळी तन्वीने विशालवर अत्यंत बोचरी टीका केली. ती म्हणाली, "हा तर बोका बसला आहे, जो मांजरींना पुढे करतो". तन्वी आणि राकेशने एकमताने विशालला नॉमिनेट केले.

तिसऱ्या फेरीत प्रभू आणि सचिन आले होते. त्यांना नॉमिनेट करण्यासाठी करण आणि प्राजक्ता आले. या दोघांनी कोणत्याही वादाशिवाय एकमताने प्रभूला नॉमिनेट केले. दरम्यान, घरात रोशन आणि विशाल यांच्यात चोरीच्या विषयावरूनही वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. आता आजच्या एपिसोडमध्ये काय धमाका होतो, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi 6: Wild Card Entry and Nominations Cause Uproar

Web Summary : Bigg Boss Marathi 6 saw Radha's elimination and a unique wild card entry: 'Nirmal Dikhawa'. Bigg Boss criticized contestants' inactive gameplay. Nominations led to heated arguments, with Deepali and Vishal nominated after disagreements and harsh words. Roshan and Vishal also clashed.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६