Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ६' मध्ये पहिल्याच कॅप्टन्सी टास्कवरुन घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कॅप्टन्सी टास्कमध्ये झालेल्या वादात सागर कारंडेशी भांडताना तन्वी कोलतेची जीभ घसरली. तन्वीने सागरला कॉमेडीवरुन हिणवल्यानंतर तोदेखील भडकला. दिपाली सय्यद, करण सोनावणे आणि घरातील इतर सदस्यांनीही तन्वीला यावरुन विरोध करत चांगलंच सुनावलं. वयाने मोठ्या असलेल्या आणि गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सागरशी अशाप्रकारे बोलल्याने तन्वीवर चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. आता मराठी कलाकारही सागर कारंडेला पाठिंबा देत असून तन्वीला विशाखा सुभेदार यांनी खडे बोल सुनावले आहेत.
विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सागर कारंडेला पाठिंबा देत तन्वीची कानउघाडणी केली आहे. "सागर कारंडे मस्त खेळतोयस रे.. कॉमेडी करतो? जाम हलक्यात घेतात विनोदी कलाकारला... कोणीही कालच्या पोरींनी यावं टपली मारुन जावं! ह्यांनी काय अनुभवलंय? असं किती काम केलं?? असो, शब्द पलटवले तिने नंतर! पण ही तन्वी पहिल्याच आठवड्यात साधारण १०व्या आठवड्यात खेळतेय असं कां खेळतेय? लगेचच दुसऱ्यांना तू मला सपोर्ट करणार का वैगरे??? अगं असं काय केलंस इतरांसाठी की तू त्यांच्याशी डील करतेयस?? आधी "दिल" तर जिंक त्यांचं..! ते मला वाटतं तिला शक्य नाही...किरकिर कर्कश आवाज..! शी...", असं म्हणत त्यांनी पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठी ५मध्येही जान्हवी किल्लेकरने अभिनेता पॅडी कांबळेला त्याच्या कॉमेडीवरुन हिणवलं होतं. तेव्हादेखील मोठा वाद निर्माण झाला होता. तेव्हाही विशाखा सुभेदार भडकल्या होत्या. या सीझनमध्येही पुन्हा कॉमेडी कलाकारांना कमी लेखलं जात असल्याने विशाखा सुभेदारांचा राग अनावर झाला आहे.
बिग बॉसच्या घरात होणाऱ्या पहिल्या कॅप्टन्सीसाठी प्राजक्ता शुक्रे, तन्वी कोलते, अनुश्री माने आणि सोनाली राऊत यांच्यामध्ये टास्क होणार आहे. यापैकी कोण बिग बॉस मराठी ६च्या घरात पहिल्या कॅप्टन्सीचा बहुमान मिळवतं, हे पाहावं लागेल. तर या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत दिपाली सय्यद, अनुश्री माने, करण सोनावणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, रोशन भजनकर, दिव्या शिंदे आणि राधा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
Web Summary : Vishakha Subhedar criticizes Tanvi Kolte for disrespecting Sagar Karande's comedy in Bigg Boss Marathi 6. She supports Karande and condemns Tanvi's behavior and abrasive tone.
Web Summary : विशाखा सुभेदार ने बिग बॉस मराठी 6 में सागर करांडे की कॉमेडी का अनादर करने के लिए तन्वी कोलते की आलोचना की। उन्होंने करांडे का समर्थन किया और तन्वी के व्यवहार और कर्कश लहजे की निंदा की।