Bigg Boss Marathi 6 :यंदाच्या सीझनच्या टॉप-५ सदस्यांची नावं आता प्रेक्षकांसमोर आली आहेत. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे यंदाचे टॉप-५ सदस्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून तन्वीला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय. अनेकांनी तिच या खेळात विजयी होईल अशी शक्यताही वर्तवली आहे. तन्वीला विजयी करण्यासाठी तिचे कुटुंबीय आणि चाहते प्रयत्न करत आहेत.
तन्वीच्या करिअरची सुरुवात जिथून झाली, त्या देवरुख गावची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई हिच्या चरणी तन्वीच्या मित्रपरिवाराने आणि घरातील सदस्यांनी नुकतेच गाऱ्हाणे घातले. "फिनालेच्या या शेवटच्या पायरीवर तन्वीला यश मिळू दे आणि तिला भरघोस मते मिळून ती विजयी होऊ दे," अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. तन्वीच्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर करत "ही शेवटची पायरी देवी आईच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू" असं म्हटलं.
असं करा मतदान
१. JioCinema App द्वारे:
Play Store किंवा App Store वरून JioCinema अॅप डाउनलोड करा.
मोबाईल नंबर आणि OTP वापरून लॉगिन करा.
'Bigg Boss Marathi' सर्च करून 'Vote' पर्यायावर क्लिक करा.
आवडत्या स्पर्धकाला निवडून ९९ मते सबमिट करा.
२. Website द्वारे:
JioCinema च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगिन करा.
'Bigg Boss' सेक्शनमध्ये जाऊन आवडत्या स्पर्धकाला निवडा आणि ९९ मते सबमिट करा.
दरम्यान, मंगळवार रात्री ९:३० पासून शनिवार दुपारी ३:०० पर्यंत रोज ९९ वोट करु शकता. बिग बॉस मराठीचा फिनाले १९ एप्रिलला कलर्स मराठीवर रात्री ८ वाजता सुरू होईल. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Summary : Tanvi Kolte is a Bigg Boss Marathi 6 finalist. Her family and friends prayed for her victory at Deorukh's Soljai Devi temple. Viewers can vote via JioCinema app/website until Saturday. The finale airs April 19th.
Web Summary : तन्वी कोलते बिग बॉस मराठी 6 की फाइनलिस्ट हैं। उनके परिवार और दोस्तों ने देवरुख के सोळजाई देवी मंदिर में उनकी जीत के लिए प्रार्थना की। दर्शक शनिवार तक JioCinema ऐप/वेबसाइट के माध्यम से वोट कर सकते हैं। फिनाले 19 अप्रैल को प्रसारित होगा।