Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन हा अनेक कारणांमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.हा शो पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अतिशय उत्सुकतेचे असतात. भाऊच्या धक्क्यावर रितेश कोणाची शाळा घेणार? आणि या आठवड्यात कोणता स्पर्धक बेघर होणार याची उत्सुकता असते. दरम्यान, आता बिग बॉसच्या घरातून अमरावतीचा पठ्ठ्या रोशन भजनकरचा प्रवास संपला आहे. आता घराबाहेर आल्यानंतर रोशनने पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बिग बॉस मराठी ६ चा सीझन सुरु होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या आवड्यात रोशन नॉमिनेट झाले होते. हे चार सदस्य अगदी पहिल्या दिवसांपासून चर्चेत होते. मात्र,सातव्या आठवड्यात रोशनने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला.
या शोमध्ये आपल्या साध्या स्वभावामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेणारा स्वर्धक म्हणजे रोशन भजनकर होता. आपल्या या स्वभाव गुणांमुळे रोशन भजनकरने लोकांची मनं जिंकली. मात्र, आता त्याचं बिग बॉसची ट्ऱॉफी उचलण्याचं स्वप्न भंगलं आहे. अशातच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रोशन भजनकरने म्हटलंय, अमरावतीच्या एका साध्या पोराला तुम्ही स्टार बनवलं.तुमच्या प्रेमामुळे मी या घरापर्यंत येऊ शकलो. माझ्या खरेपणामुळे मी आजवर इथे टिकलो आणि तोच खरेपणा बाहेर येण्यासाठी कारण ठरला. पण, या काळात तुम्ही मला जो सपोर्ट केला, प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार...". त्यानंतर रोशनने बिग बॉसच्या घरातील भावुक व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, "कहाणी खत्म हुई, किरदार नही...", रोशनची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत."खरंच मनापासून वाईट वाटल....रोशन दादा...", तसेच "तू आमच्यासाठी विनर होता..." अशा कमेंट्स करत चाहत्यांनी रोशनचं कौतुक केलं आहे.
Web Summary : Roshan Bhajankar's Bigg Boss journey ends. His honesty, while loved, led to eviction. He thanks fans for their support and love, expressing gratitude for the opportunity and recognition.
Web Summary : 'बिग बॉस' से रोशन भजनकर बाहर हुए। उनकी ईमानदारी के कारण वे बाहर हुए। उन्होंने प्रशंसकों को उनके समर्थन और प्यार के लिए धन्यवाद दिया और अवसर के लिए आभार व्यक्त किया।