Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व सध्या प्रचंड चर्चेत आहे. दिवसेंदिवस गेम अधिकच कठीण होत चालला आहे. प्रत्येक जण घरात टिकून राहण्यासाठी आपला गेम दाखवत आहेत. शो जसा-जसा फिनालेकडे पुढे जातोय, तसं-तसं प्रेक्षकांच्या मनातील कोण विजेता होणार, याबद्दलची उत्सुकता सुद्धा वाढत चालली आहे. 'बिग बॉस' शोमध्ये प्रेक्षक नेहमीच फॅमिली विकची आतुरतेने वाट पाहत असतात. आता अखेर हा फॅमिली वीक सुरू झाला आहे. या वीकमध्ये स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटण्यासाठी 'बिग बॉस'च्या घरात येत आहेत. आजच्या एपिसोडचे प्रोमो समोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कलर्स मराठीकडून नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रभू शेळके यांचे कुटुंबीय घरामध्ये येतात. आपल्या आई-वडिलांना पाहून प्रभू शेळके आनंदी होतो. त्याला अश्रूही अनावर होतात. त्याचे वडील त्याला भेटल्यानंतर उचलून घेताना प्रोमोत दिसून येत आहेत. बिग बॉसच्या घरातील हा क्षण पाहून प्रेक्षकांचे डोळेही पाणावले आहेत.
प्रभू शेळके हा आपल्या हटके स्टाईल आणि विनोदी रिल्समुळं 'छोटा डॉन' म्हणून ओळखला जातो. प्रभू हा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या प्रभूनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो 'थॅलेसेमिया' या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. यावर उपचारांसाठी मोठा खर्च येतो. त्याच्या उपचारांसाठी त्याच्या आईवडिलांनी वावर विकल्याचं त्यानं सांगितलं. पण आपल्या आजाराचं भांडवल न करता, चेहऱ्यावर हास्य ठेवून प्रभूनं प्रेक्षकांचे मनोरंजन करणं सुरू ठेवलं आहे.
Web Summary : Bigg Boss Marathi 6's family week brought Prabhu Shelke's parents to the house. Shelke, known as 'Chota Don', was emotional, reuniting with them. He hails from a small village and battles thalassemia, yet entertains through social media.
Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' के फैमिली वीक में प्रभु शेळके के माता-पिता घर आए। 'छोटा डॉन' के नाम से मशहूर शेळके भावुक हो गए और उनसे मिले। वह एक छोटे से गाँव से हैं और थैलेसीमिया से जूझ रहे हैं, फिर भी सोशल मीडिया के माध्यम से मनोरंजन करते हैं।